सर्वोपचारचे आयसीयु फुल्ल, कोविड वॉर्डातील खाटाही पडताहेत अपुऱ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:19+5:302021-04-01T04:19:19+5:30
३० खाटांचे आयसीयू पॅक सर्वोपचारमधील ३० खाटांचे कोविड आयसीयू पॅक झाले असून ऐनवेळी रुग्ण वाढल्यास कसरत करावी लागणार आहे. ...
३० खाटांचे आयसीयू पॅक
सर्वोपचारमधील ३० खाटांचे कोविड आयसीयू पॅक झाले असून ऐनवेळी रुग्ण वाढल्यास कसरत करावी लागणार आहे. दरम्यान पर्यायी आयसीयूची तत्काळ व्यवस्थाही केली जाईल. मात्र मनुष्यबळ कुठून आणावे, हा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
तज्ज्ञ २५ डाॅक्टरांची गरज
सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णसेवेचा ताण पाहता तज्ज्ञ २५ डाॅक्टरांची गरज आहे. आणखी आयसीयू सुरू करण्यासाठी इन्टेन्सिव्हिस स्पेशालिस्टची गरज आहे. मात्र सध्या ९ इन्टेन्सिव्हिस स्पेशालिस्टवर कारभार आहे. शिवाय भूलतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञ डाॅक्टरांचीही गरज आहे. तज्ज्ञ डाॅक्टरांच्या नेमणूकीसाठी शासनाकडे मागणी केली आहे. पण संपूर्ण राज्यातच मनुष्यबळाची कमतरता असल्याने डाॅक्टर्स कुठून मिळणार हा प्रश्न आहे.
रूग्ण होताहेत उशीरा दाखलअनेक रुग्ण गंभीर अवस्थेत उशीरा दाखल होतात. तर दूर्धर आजारामुळे काही रुग्णांमधील गुंतागुंत वाढलेली असते, अशा रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. २४ तास तज्ज्ञांना अलर्ट राहावे लागते, असे अधिकारी सांगतात.