कृषी विद्यापीठाच्या पाणलोट प्रक्षेत्रावर पाणी व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:52 PM2019-03-26T13:52:13+5:302019-03-26T13:52:24+5:30
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाणलोट प्रक्षेत्रावर पाणी व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल तयार केले आहे.
अकोला: मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याचा परिणाम विदर्भ, खान्देश, मराठवाड्याला अधिक झाला आहे. ओल्यापेक्षा कोरड्या दुष्काळाचे सावट सतत या विभागावर असते. विदर्भातील उन्हाळा तर सर्वश्रुत आहे. कमाल तापमान आताच ४०.५ अशांवर पोहोचले असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. या पृष्ठभूमीवर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाणलोट प्रक्षेत्रावर पाणी व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल तयार केले आहे. कृषी विद्यापीठाला यासाठीचा आंतरराष्टÑीय पुरस्कार मिळाला आहे. कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सव वर्षात हे आदर्श मॉडेल शेतकऱ्यांच्या शेतावर नेण्याची गरज आहे.
भविष्यात अल्प पाण्यात येणाऱ्या पिकांचे वाण शोधणे आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. ही धोक्याची घंटा ओळखून विकसित देशांनी जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक तापमानात वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या वातावरणातील बदलांमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा प्रत्यय पावसाच्या प्रमाणावरूनही दिसून येत आहे. अवेळी, अति, कमी पावसाचा फटका सर्वांनाच बसत आहे. शेती उत्पादनावर याचे परिणाम जाणवू लागले आहेत. पावसाचा लहरीपणा बघून विकसित देशांनी प्रतिवर्ष प्रति माणूस आवश्यक भूपृष्ठावर पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे. या तुलनेत भारतात प्रतिमाणूस केवळ दोनशे ते सव्वा दोनशे घनमीटर प्रतिवर्ष एवढीच पाणी साठवण क्षमता आहे.
भारतात घरगुती वापरासह पिण्यासाठी, शेती, उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक आहे. तथापि, ही गरज भागविण्यासाठी भूपृष्ठावर पाण्याची परिणामकारक साठवण केली जात नसल्याने, शेती उद्योग तर सोडाच, पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सर्वदूर पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसते. मागील १५ वर्षांचा इतिहास बघितल्यास येथे पावसाचे दीर्घ वार्षिक खंड पडलेले आहेत. पुढच्या वर्षी चांगला पाऊस होईल, हे सांगणे कठीण आहे, असा निष्कर्ष तज्ज्ञ काढत आहेत.
- डॉ. पंदेकृविने मागील तीन दशकात पाणलोट क्षेत्रात प्रचंड काम करू न निष्कर्ष काढूल मॉडेल तयार केले. पाऊस व्यवस्थापनाचा आदर्श आराखडा तयार केला. याचा अवलंब केला तर गरजेइतके पाणी आपणास हमखास मिळणार.
डॉ. सुभाष टाले,
माजी संचालक,
कृषी पर्यावरण तसेच प्रमुख मृद व जलसंधारण,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.