प्रेमात पडताना प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखा! - सचिन थिटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:30 PM2019-01-30T12:30:29+5:302019-01-30T12:31:07+5:30
अकोला: आजच्या तरुणाईने प्रेमात पडताना किंवा प्रेमविवाह करताना प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखल्यास भविष्यातील धोके टाळता येतील, असे प्रतिपादन पनवेल येथील जोडीदाराची विवेकी निवड अभियानाचे सचिन थिटे व महेंद्र नाईक यांनी केले.
अकोला: आजच्या तरुणाईने प्रेमात पडताना किंवा प्रेमविवाह करताना प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखल्यास भविष्यातील धोके टाळता येतील, असे प्रतिपादन पनवेल येथील जोडीदाराची विवेकी निवड अभियानाचे सचिन थिटे व महेंद्र नाईक यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय सेवा योजना व विवेक वाहिनी, श्री शिवाजी महाविद्यालयाच्यावतीने मंगळवारी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात आयोजित जोडीदाराची विवेकी निवड संवाद शाळेत ते बोलत होते.
प्रेमात पडताना व जोडीदाराची निवड या विषयावर त्यांनी युवकांशी संवाद साधला. या संवाद शाळेचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार होते. विचारपीठावर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय तिडके, जिल्हा प्रधान सचिव बबन कानकिरड उपस्थित होते. त्यावेळी सुरेखा भापकर मुंबई यांनी जोडीदाराची निवड कशी करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महेंद्र नाईक यांनी जोडीदाराची विवेकी निवड का करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संवाद शाळेचे प्रास्ताविक डॉ संजय तिडके यांनी केले. संचालन रोहन बुंदेले याने केले. आभार शुभम भोंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल मालोकार, रविना वानखेडे, दामिनी जाधव, गौरी सरोदे व दिनेश सरप यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)