धनुष्याची ‘प्रत्यंचा’ ताणलीच गेली तर

By admin | Published: September 17, 2014 12:49 AM2014-09-17T00:49:33+5:302014-09-17T00:49:33+5:30

महायुती धोक्यात : बुलडाण्यातही भाजपाचीही शतप्रतिशतची तयारी.

If the 'bowl of the bow' is stretched | धनुष्याची ‘प्रत्यंचा’ ताणलीच गेली तर

धनुष्याची ‘प्रत्यंचा’ ताणलीच गेली तर

Next

राजेश शेगोकार / बुलडाणा
आघाडीपेक्षाही विधानसभेत महायुती दमदार असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात महायुतीमधील ताणलेल्या संबधांचे पडसाद घुमू लागले आहेत. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील सातपैकी तीन जागा सेना तर चार जागा भाजपाने लढविल्या. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन आमदार निवडून आल्याने महायुतीच्या पारडयात मतदारांनी समसमान यश टाकल्याचे दिसत आहे. व हेच चित्र गेल्या दशकापासुन कायम आहे. त्यामुळे आता धनुष्याच्या ह्यप्रत्यंचह्ण ताणला तर कमळही सर्वत्र फुलण्यास तयार असल्याचा सुर भाजपाच्या गोटातुन ऐकायला मिळत आहे.
महायुतीमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या जागा वाटपावरून बेबनाव निर्माण होऊन त्यातून युती तुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने बुलडाण्यातही त्याची चाचपणी सुरू झाली आहे. ज्या मतदार संघात वर्षानुवर्ष सेनेचा उमेदवार दिला आहे तेथे भाजपाची तर भाजपाचा उमेदवार असलेल्या ठिकाणी सेनेची वाढ खुंटली आहे. एकमेकांच्या पक्षांना आपआपल्या प्रभाव क्षेत्रात बोन्साय करण्याची ही परंपरा सतत दक्षतेने पाळल्या गेल्यामुळे युतीधर्माच्या नावाखाली कार्यकर्त्यांची मात्र कुचंबना झाली आहे. बुलडाणा, सिंदखेडराजा व मेहकर या मतदारसंघात सेनेचा उमेदवार दिला जा तो. या तिन्ही मतदार संघात भाजपाची स्थिती गंभीर अशीच आहे. मात्र आपल्या निष्ठावान कार्यक र्त्यांच्या रूपाने भाजपा आता कामाला लागली आहे. मोदी लाट अजून ओसरली नाही, संघही सक्रीय झाला आहे, अशा अशावादावर ह्यकमळह्ण फुलविण्याचे स्वप्न भाजपा पाहत असल्याने महायुतीच्या ताणलेल्या सबंधामध्ये या मतदार संघातील मित्रपक्षाकडून दुखावलेले कार्यकर्ते आशावादी झाले आहेत. याउलट चिखली, जळगाव जामोद व मलकापूर तसेच खामगाव मतदार संघात भाजपाचा उमदेवार असतानाही सेनेने आपले अस्तीत्व वेळोवेळी दाखवूनच दिले आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाने सेनेला बाजुला ठेवत सत्ता हस्तगत करण्याची अनेक उदाहरणे येथे दिसुन आली आहेत. या दोन्ही पक्षातील वर्चस्वाच्या लढाईला आता ताणलेल्या सबंधाचे खतपाणी मिळत आहे. उद्या युती तुटली तर उमेदवारीसाठी लागणारे जाती-पातीचे निकष पाहून इच्छुकांना आ तापासुनच उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत.

Web Title: If the 'bowl of the bow' is stretched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.