कॅनॉल रस्त्याचे काम न झाल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 02:42 AM2017-11-27T02:42:06+5:302017-11-27T02:43:54+5:30
अकोला: डाबकी रोड येथील कॅनॉल रस्त्याचे काम प्रलंबित आहे. या संदर्भात अनेकवेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन देऊन हे काम त्वरित न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क

आ. गोपीकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांच्यासह सर्व नगरसेवक व शिवसैनिकांनी डॉ. पाटील यांची भेट घेऊन त्यांना या रस्त्याबाबत जाब विचारला. डाबकी रोड येथील कॅनॉल रस्त्याच्या कामासाठी मागील एक वर्षापूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. रस्ता त्वरित व्हावा, यासाठी शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेऊन पालकमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी आ. गोपीकिशन बाजोरिया, महिला संघटक ज्योत्स्ना चौरे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण, मंजूषा शेळके, शशिकांत चोपडे, अनिता मिश्रा, सपना नवले यांच्यासह माजी नगरसेवक शरद तुरकर, अभिजित खडसान, रुपेश ढोरे, राजेश इंगळे, कृणाल शिंदे, चेतन मारवाल, स्वप्निल अहिर, देवा गावंडे, सुरज भिंडा, लखन चौधरी, सागर भारूका आदी उपस्थित होते.