बँकांमधील गर्दी हटेना, कोरोना संसर्गाचा धोका कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:19 AM2021-05-18T04:19:53+5:302021-05-18T04:19:53+5:30

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकेत ...

If the crowds in the banks do not go away, the risk of corona infection will remain forever | बँकांमधील गर्दी हटेना, कोरोना संसर्गाचा धोका कायमच

बँकांमधील गर्दी हटेना, कोरोना संसर्गाचा धोका कायमच

Next

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकेत तसेच बँकांसमोर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तथापि, गर्दी कमी होत नसल्याचे पाहून ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत. याउपरही गर्दी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कडक निर्बंध असून, यामध्ये बँकांना सूट देण्यात आली आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने तसेच पीएम किसान योजनेंतर्गतचे दोन हजार रुपये काढण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे. मागील सलग तीन दिवसांपासून बँका बंद असल्याने सोमवारी अकोला शहरासह अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी या तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. बँकांमधील आर्थिक व्यवहार हा महत्त्वाचा आहेच; परंतु बँकांमधील गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेणेही आवश्यक ठरत आहे.

ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग !

बँकांमध्ये तसेच बँकांसमोर प्रचंड गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अनेक जण मास्कचा वापरही करीत नसल्याचे सोमवारी दिसून आले. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची साखळी कशी तुटणार? असा प्रश्न कायम आहे. बँकांमधील गर्दीमुळे कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येते.

Web Title: If the crowds in the banks do not go away, the risk of corona infection will remain forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.