‘मरण यावे तर असे!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:04 AM2017-08-14T02:04:51+5:302017-08-14T02:04:51+5:30
अकोला: काश्मीरमध्ये जानेवारी २0१७ मध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्हय़ातीन दोन जवानांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आणि सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले होते. या अंतिम संस्काराच्या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नेते मंडळी आणि सैन्याचे अधिकारी वीर सुपुत्रांना सलामी देत असल्याचे वृत्त आणि छायाचित्र वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर ते सुमेध गवई यांनी पाहिले आणि जिवलग मित्र असलेल्या मंगेश दानडे याच्याशी बोलताना मरण असावे तर असे, अशी प्रतिक्रिया देत आपल्याही नशिबात वीरमरण असावे, असे ते बोलले होते. वीरपुत्र सुमेधचा मित्र मंगेश दानडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

काश्मीरमध्ये सेवा सुरू झाल्यानंतर जानेवारी महिन्यात सुमेध गवई अकोल्यात आला होता. नेमके याच महिन्यात झालेल्या भूस्खलनात माना येथील रहिवासी संजय सुरेश खंडारे आणि वाशिम बायपास परिसरातील रहिवासी आनंद शत्रुघ्न गवई या दोन भारत मातेच्या सुपुत्रांना हिमस्खलनात वीरमरण आले होते. या दोघांवरही शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
जवानांनी २१ तोफांची सलामी दिली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सैन्यातील अधिकारी या दोन्ही जवानांना सलामी देत असल्याचे छायाचित्र आणि वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त आणि छायाचित्र पाहत असताना सुमेधने जिवलग आणि बालपणीचा हातला येथील मित्र मंगेश रमेश दानडे याच्याशी बोलताना अशा प्रकारच्या वीरमरणाची इच्छा व्यक्त केली. मरण तर प्रत्येकालाच आहे; मात्र अशा प्रकारचे वीरमरण आल्यास जीवनाचे सार्थक होणार असल्याचे विचार सुमेधने बोलून दाखविले. मंगेशशी या विषयावरून किरकोळ वादही झाला; मात्र विषय बदलला आणि वाद मिटला. सुमेध व मंगेश दोघांनीही सैन्यात भरती होण्यासाठी सोबतच मेहनत घेतली. दोघांनीही सोबतच भरतीमध्ये जाऊन देशसेवा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुमेधला यश मिळाले; मात्र मंगेश अयशस्वी झाला.