पालेभाज्या व्यावसायिकांवरील अन्याय दूर न केल्यास उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:45+5:302020-12-25T04:15:45+5:30
मनपा प्रशासनाला जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल बांधायचे आहे. काेराेना साथ राेगाची सबब पुढे करीत मनपाने जनता भाजी ...
मनपा प्रशासनाला जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल बांधायचे आहे. काेराेना साथ राेगाची सबब पुढे करीत मनपाने जनता भाजी बाजारातील घाऊक व्यावसायिकांच्या हर्रासीवर निर्बंध आणले. त्यामुळे सुमारे २२० पेक्षा अधिक घाऊक व्यावसायिकांनी एकत्र येत लोणी रस्त्यावर सावित्रीबाईं ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजाराची निर्मिती केली. भाजीपाला विक्रेत्यांनी जमिनीची खरेदी करून बाजारासाठी गाळे बांधले आहेत. मागील काही दिवसांपासून जनता भाजी बाजारात काही व्यावसायिकांनी भाजीपाला हर्रासी पुन्हा सुरु केल्यामुळे लाेणी मार्गावरील गाळेधारक,अडते,व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. याचा परिणाम कास्तकार, किरकोळ विक्रेत्यांवरही झाला असल्याचे यावेळी व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला जनता भाजी बाजारात पूर्ववत जागेवर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी,अन्यथा कुटुंबीयांसहीत साखळी उपाेषण सुरु करणार असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष राजेश डाहे, कोषाध्यक्ष प्रशांत चिंचोलकार, संचालकगण संतोष अंबरते,अनंत चिंचोलकर,गणेश घोसे,अनिल गोलाईत,शिवा पल्हाडे,राजेश ढोले,अमोल गोलाईत,योगेश चापके,संजय कोकाटे,गजानन कातखेडे,राजेश ढोमने, सुलभा अंबरते, नंदा गोलाईत समवेत सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजार भाजीपाला घाऊक व्यावसायिक,अडते व गाळेधारक आदी उपस्थित होते.