रेशन दुकानदार धान्य देत नसेल तर दुसऱ्या दुकानाचा पर्याय खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:51 AM2020-12-04T04:51:04+5:302020-12-04T04:51:04+5:30
n लाेकमत न्यूज नेटवर्क अकाेला : रेशन दुकानातून धान्य मिळत नाही अशा तक्रारी अनेकदा असतात; मात्र कार्डधारकाला दुसऱ्या रेशन ...
n लाेकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : रेशन दुकानातून धान्य मिळत नाही अशा तक्रारी अनेकदा असतात; मात्र कार्डधारकाला दुसऱ्या रेशन दुकानाचा पर्याय नसल्याने त्याच दुकानदाराची मनमानी सहन करावी लागते. या प्रकाराला आता चाप बसला असून, ग्राहकाला आपले रेशन दुकान बदलता येणे शक्य झाले आहे. प्रशासनाने पाेर्टेबिलिटीचा पर्याय ग्राहकांना दिला असून, जिल्ह्यात १५ हजार ८८४ कार्डधारकांनी लाभ घेतला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट, अंत्योदय अन्न योजना व एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्तभाव धान्य दुकानांमधून दरमहा धान्य वितरित करण्यात येते. संबंधित शिधापत्रिकाधारकांना नियाेजित स्वस्तभाव धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण हाेत नसेल तर ग्राहकांना दुसऱ्या दुकानाचा पर्याय उपलब्ध आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत प्राधान्य गट, अंत्योदय अन्न योजनेंतर्गत व एपीएल शेतकरी दोन लाख ९३ हजार ५८९ शिधापत्रिकाधारक १३ लाख १९ हजार ८०० लाभार्थींना दरमहा स्वस्त धान्याचा लाभ देण्यात येत आहे.
२,९३,५८९
एकूण रेशनकार्डधारक
पोर्टेबिलिटीचा
लाभ घेतलेले
१५,८८४
काेट
ज्या शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानासंदर्भात तक्रारी असतील त्यांनी तत्काळ पुरवठा विभागाला संपर्क करावा तसेच ज्यांना आपल्या जवळचे दुकान हवे असेल किंवा इतर कारणांमुळे पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून दुसऱ्या दुकानामधून लाभ घेता येईल.
बी.यू. काळे, पुरवठा अधिकारी
बाॅक्स
कारवाई सुरूच
ज्या रेशन दुकानांच्या बाबतीत सातत्याने तक्रारी येत आहेत अशा दुकानांचा परवाना निलंबित करण्याचीही कारवाई केली जात आहे. नियमितपणे धान्याचा साठा व वितरण याबाबत तपासणी हाेत असून, तक्रारीची दखल घेऊन कारवाई करत असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले.
बाॅक्स
अशा आहेत तक्रारी
पोर्टेबिलिटीसाठी बायाेमॅट्रिक ओळख पटविताना नेटवर्कच्या माेठ्या अडचणी आहेत, त्यामुळे अनेकांना धान्य मिळत नाही. धान्याचे वितरण उशिरा हाेणे, धान्याचा दर्जा याेग्य नसणे अशा तक्रारी सार्वत्रिक स्वरूपाच्या आहेत.