विद्यार्थी आजारी असल्यास गोवर, रुबेला लसीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 03:10 PM2018-12-15T15:10:10+5:302018-12-15T15:10:21+5:30

अकोला : रुबेला, गोवर लसीकरणानंतर विद्यार्थी आजारी पडत असल्याच्या घटना विविध भागातून समोर येत आहेत; परंतु ज्या विद्यार्थ्यांना ही समस्या होत आहे, त्यातील बहुतांश विद्यार्थी दीर्घ आजारी किंवा मेंदूशी निगडित समस्या असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.

If the students are sick, there is no vaccination for the gover and rubella | विद्यार्थी आजारी असल्यास गोवर, रुबेला लसीकरण नाही

विद्यार्थी आजारी असल्यास गोवर, रुबेला लसीकरण नाही

googlenewsNext

- प्रवीण खेते
अकोला : रुबेला, गोवर लसीकरणानंतर विद्यार्थी आजारी पडत असल्याच्या घटना विविध भागातून समोर येत आहेत; परंतु ज्या विद्यार्थ्यांना ही समस्या होत आहे, त्यातील बहुतांश विद्यार्थी दीर्घ आजारी किंवा मेंदूशी निगडित समस्या असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी लसीकरण घेऊ नये, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
गोवर, रुबेला दुहेरी लसीकरण पहिल्यांदाच राबविण्यात येत असून, त्यावर अफवांचे सावट पसरले आहे. अशातच लसीकरणानंतर अनेक विद्यार्थी आजारी पडत असल्याच्या घटना राज्यातील विविध भागातून समोर आल्या आहेत. आरोग्य विभागाने सतर्कता दाखवत त्या विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार केला; पण उपचारादरम्यान यातील बहुतांश विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या आजाराची समस्या असून, त्याचा औषधोपचारही सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे आधीच रोगप्रतिकारक शक्ती कमी असताना त्यांना गोवर, रुबेला लसीकरणामुळे शरीरावर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचेही आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे लसीकरणापूर्वी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आवश्यक आहे. यामध्ये पालकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

पालकांची भूमिका
गोवर, रुबेला लसीकरणाच्या दिवशी पालकांनी शिक्षकांसह डॉक्टरांना पाल्याच्या आजारासंदर्भात माहिती द्यावी, आपल्या पाल्यावर सुरू असलेल्या उपचाराची संपूर्ण माहिती डॉक्टरांना दिल्यावर त्यांच्या सल्यानुसारच गोवर, रुबेलाची लस द्यावी, असे आवाहनदेखील आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

या समस्या असल्यास लसीकरण टाळा!
हृदयविकार
अस्थमा
मेंदूशी निगडित आजार
टायफॉइड
मिर्गी, फिट्स
किडनीच्या समस्या
किंवा इतर दीर्घ आजार
 

शासनाच्या गाइडलाइन्सनुसार विद्यार्थ्यांना दीर्घ आजार किंवा मेंदूशी निगडित आजार असल्यास त्यांना गोवर, रुबेला लसीकरण नाही. लसीकरणापूर्वी पालकांनी डॉक्टरांना आपल्या पाल्याच्या आरोग्याशी निगडित समस्या सागाव्यात. त्यानंतरच डॉक्टरांच्या सल्ल्याने गोवर, रुबेलाची लस द्यावी.
- डॉ. फारूख शेख, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका अकोला.

 

Web Title: If the students are sick, there is no vaccination for the gover and rubella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला