लाॅकडाऊन नकाे असेल तर नियम पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:28 AM2021-02-23T04:28:43+5:302021-02-23T04:28:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा निर्बंध ...

If there is no lockdown, follow the rules | लाॅकडाऊन नकाे असेल तर नियम पाळा

लाॅकडाऊन नकाे असेल तर नियम पाळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा निर्बंध कडक केले आहेत अकाेला, अकाेट व मूर्तिजापूर या शहरांमध्ये मंगळवारपासून लाॅकडाऊन सुरू हाेत आहे. काेराेनाच्या पहिल्या लाॅकडाऊननंतर हळूहळू अर्थकारण रुळावर येत असतानाच आता दुसऱ्या लाॅकडाऊनचा दणका बसल्याने सारेच धास्तावले आहेत. लाॅकडाऊन हा पर्याय नाही तर उपाययाेजनांची अंलबजावणी प्रभावी हाेणे गरजेचे आहे असे मत शहरातील उद्याेजक, व्यावसायिकांनी व्यक्त केले.

कोरोना संसर्गाच्या फैलावाचा वेग पाहता जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या म्युटेट स्ट्रेनचा धोका वर्तविण्यात येत आहे. मूर्तिजापूर, अकोटसह काही भागात कोरोनाचे नवे हाॅटस्पॉट निर्माण होऊ लागले होते, त्यामुळे प्रशासनाने लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हातावर पाेट असणाऱ्यांचा गाडा पुन्हा एकदा रूळावरून घसणार आहे. पूर्ण लाॅकडाऊन करण्याऐवजी नियमांचे बंधन टाकावे, नियम पाळण्याची सक्ती करावी. दंडात्मक कारवाईचा बडगा उचलावा मात्र सर्वच ठप्प करून पुन्हा एकदा अर्थकारण बिघडवू नये, अशाच अपेक्षा व्यक्त हाेत आहेत

धोका वाढतोय...

शेजारच्या अमरावती येथे कोरोनाचा नवा म्युटेट स्ट्रेन आढळल्याने अकोल्यातील रुग्णांमध्येही जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी बाळगत आरोग्य विभागातर्फे ७५ कोविड रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील पाठविण्यात आले आहेत.

उद्योग, व्यवसायाचे प्रतिनिधी म्हणतात....

माेठ्या लाॅकडाऊननंतर आता पुन्हा त्याच संकटाला सामाेरे जावे लागत आहे. आम्ही आदेश पाळू मात्र केवळ पार्सलच्या भरवशावर हा व्यवसाय तग धरू शकत नाही.

याेगेश अग्रवाल

अध्यक्ष खाद्यपेय विक्रेता संघटना

पहिल्या लाॅकडाऊनमध्ये १८ नाभिकांनी आत्महत्या केल्या. आता कुठे दुकाने सुरू झाली हाेती. आता पुन्हा उपासमारीचे संकट आहे. त्यामुळे सवलत देण्याची गरज आहे

गजानन वाघमारे, अध्यक्ष, नाभिक समाज दुकानदार संघटना...................... प्रतिनिधी कोट

Web Title: If there is no lockdown, follow the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.