कोविड निगेटिव्ह रिपोर्ट नाही, तर रेल्वेने कर्नाटकात जाता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:22+5:302021-03-26T04:18:22+5:30
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांकडे कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक केले आहे. या ...

कोविड निगेटिव्ह रिपोर्ट नाही, तर रेल्वेने कर्नाटकात जाता येणार नाही
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांकडे कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून रेल्वेने कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांनी कोविड चाचणी करून रिपोर्ट आल्यानंतरच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटक राज्यातील रेल्वे स्थानकांवर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. कोरोना चाचणी अहवाल नसलेल्या प्रवाशांना स्थानकाबाहेर पडू दिले जाणार नसल्याने प्रवाशांनी आधीच कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट बाळगणे गरजेचे झाले आहे. प्रवास करण्याच्या बेतात असलेल्यांना किमान चार दिवस आधी चाचणी करावी लागणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडून करण्यात आले आहे.
अकोल्यातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या गाड्या
०२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को दि गामा०२६३० हजरत निजामुद्दीन - यशवंतपूर
०६५२८ न्यू दिल्ली - बंगळुरू
०६५२४ हजरत निजामुद्दीन - यशवंतपूर
०९३०२ डॉ. आंबेडकर नगर - यशवंतपूर