पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास पुरवठा बंद; स्थानिक स्वराज्य संस्थांना पाटबंधारे विभागाचा इशारा.

By रवी दामोदर | Published: January 29, 2024 05:08 PM2024-01-29T17:08:42+5:302024-01-29T17:11:20+5:30

किमान ५० टक्के रक्कम तत्काळ न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा अकोला पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे.

If water bill is not paid the supply will be cut off in akola warning of irrigation department | पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास पुरवठा बंद; स्थानिक स्वराज्य संस्थांना पाटबंधारे विभागाचा इशारा.

पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास पुरवठा बंद; स्थानिक स्वराज्य संस्थांना पाटबंधारे विभागाचा इशारा.

रवी दामोदर, अकोला : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठा योजनांनी वेळेवर पाणीपट्टीचा भरणा न केल्याने थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. किमान ५० टक्के रक्कम तत्काळ न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा अकोला पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची मार्च २०२४ पर्यंत २८ कोटी २४ लक्ष ८३ हजार रूपये आकारणी होत असून, केवळ २ कोटी ६२ लक्ष ६८ हजार रूपयेच वसुली झाली आहे. मार्च २०२४ पर्यंत २५ कोटी ६२ लक्ष १५ हजार रूपये इतकी आकारणी अपेक्षित आहे. पाणीपट्टी भरणा करण्यास जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान ५० टक्के पाणीपट्टी भरणा करावा अन्यथा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ अन्वये पाणीपुरवठा बंद करण्यात येईल व संबंधित यंत्रणा जबाबदार राहतील, असा इशारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ. खु. वसुलकर यांनी दिला आहे.

Web Title: If water bill is not paid the supply will be cut off in akola warning of irrigation department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.