'वान'च्या पाण्यासाठी रक्त सांडावे लागले तरी चालेल - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:11 PM2017-11-30T19:11:34+5:302017-11-30T19:24:19+5:30

वान हनुमानसागर धरणातले पाणी शेतकर्‍यांच्या हक्काचे असून, सिंचन सोडून दुसरीकडे जाऊ देणार नाही. सिंचनाला प्राधान्य दिले नाही तर शेतकर्‍यांसाठी रक्त सांडावे लागेल, आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे खडे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले.

If you have to bleed the water for WAN water, it will be good for you | 'वान'च्या पाण्यासाठी रक्त सांडावे लागले तरी चालेल - बच्चू कडू

'वान'च्या पाण्यासाठी रक्त सांडावे लागले तरी चालेल - बच्चू कडू

googlenewsNext
ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न पेटला शेतकर्‍यांसाठी प्रहार करणार आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : वान हनुमानसागर धरणाचे पाणी शहरातील अमृत योजनेला देण्याचा घाट रचला गेला; परंतु शेतकर्‍यांच्या हक्काचे सिंचन सोडून पाणी दुसरीकडे जाऊ देणार नाही. सिंचनाला प्राधान्य दिले नाही तर शेतकर्‍यांसाठी रक्त सांडावे लागेल, आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे खडे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले.
शेतकर्‍यांच्या सिंचनासाठी महत्त्वपूर्ण धरण हनुमानसागर तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना वरदान ठरलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा धरण १00 टक्के भरले असताना यावर्षी रब्बी सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याचे संकेत प्राप्त होताच शेतकर्‍यांनी पाण्यासाठी आंदोलन, निवेदन, अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या; परंतु मार्ग निघत नव्हता. वान हनुमानसागराचे  पाणी जळगाव जा., संग्रामपूर, शेगाव, तेल्हारा व अकोटसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ८४ खेडी पाणी पुरवठय़ासाठी दिले जात आहे. त्यातच आता पुन्हा अकोला शहरातील अमृत योजनेकरिता पाणी नेण्याचा घाट असल्याने तालुक्यातील १५ हजार हेक्टर शेती वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकारामुळे मूळ उद्देश असलेल्या सिंचनाला खोडा बसणार आहे. या सर्व प्रकाराने परिसरातील  शेतकरी संघटना, शिवसेना यांनी आंदोलने केली; परंतु तोडगा निघत नव्हता. वानच्या पाण्याचा शेतकरी सिंचनासाठीच वापर व्हावा, याकरिता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन शेतकर्‍यांची बाजू मांडली. यावेळी तेल्हारा तालुक्यातील प्रहारचे कार्यक्रर्ते राजेश पाटील, तुषार पुंडकर, विनोद खुमकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांच्यावतीने सविस्तर निवेदन देण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी आधी पाणी सिंचनासाठी द्यावे, नंतर शहरातील योजनांना द्यावे, असे होत नसेल तर शेतकर्‍यांसाठी प्रहार संघटना रक्त सांडायचे काम पडल्यास मागे हटणार नाही. त्याकरिता आधी सिंचन नंतर इतर योजना, असे खडे बोल सुनावले. सिंचनासाठी दोन पाणी देण्याचे अधिकारी सांगत असले तरी दोन पाण्यात पीक येत नाही. त्यामुळे सर्वतोपरी शेतकरी सिंचन विचार व्हावा, असे सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसात वानचे पाणी मिळण्याचे दिसते. 

Web Title: If you have to bleed the water for WAN water, it will be good for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.