घरकुल हवे असेल तर पाच हजार रुपये जमा करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:26 AM2020-12-30T04:26:05+5:302020-12-30T04:26:05+5:30
पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिल्या जाते. शहरात २०१७ पासून ते आजपर्यंत महापालिका ...
पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिल्या जाते. शहरात २०१७ पासून ते आजपर्यंत महापालिका प्रशासनाने ५४ हजार नागरिकांची नाेंदणी केली आहे. यापैकी केवळ ६८० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, याेजनेची अंमलबजावणी करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. परंतु याेजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या अपेक्षा अद्यापही कायम असल्याने त्यांच्याकडून मनपाचे उंबरठे झिजवल्या जात असल्याचे दिसून येते. लाभार्थ्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत काही अज्ञात व्यक्तींकडून आर्थिक गंडा घालण्याचा प्रयत्न हाेत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. मनकर्णा प्लॉट येथील पात्र लाभार्थी योगीराज वाडे यांना घरकुल रद्द झाल्याचे सांगत यादीमध्ये नाव नाेंदविण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीद्वारे केली. याप्रकरणी वाडे यांनी रामदास पेठ पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली. दरम्यान, या प्रकाराची मनपा प्रशासन व महापाैर अर्चना मसने यांनी दखल घेत ‘पीएम’आवास याेजनेमधील पात्र लाभार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.
‘पीएम’आवास याेजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी अथवा अनुदानाच्या मागणीसाठी काेणत्याही व्यक्तीला पैसे देण्याची गरज नाही. काेणीही पैशांची मागणी केल्यास पाेलीस स्टेशन व मनपा प्रशासनाकडे तक्रार करावी.
-अर्चना मसने, महापाैर, मनपा
; ! ? () -