भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमानाचे भान ठेवावेच लागेल- रणजित पाटील

By admin | Published: June 11, 2016 02:58 AM2016-06-11T02:58:00+5:302016-06-11T02:58:00+5:30

‘लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअर’चे थाटात उद्घाटन

If you want to know about the future, then you have to keep the awareness of the present- Ranjit Patil | भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमानाचे भान ठेवावेच लागेल- रणजित पाटील

भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमानाचे भान ठेवावेच लागेल- रणजित पाटील

Next

अकोला: बदल हा सृष्टीचा नियम आहे. झपाट्याने बदलणार्‍या काळाप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा शिक्षणाच्या निरनिराळय़ा संधी निर्माण झाल्या आहेत. आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहणार्‍यांनी भविष्याचा वेध घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वर्तमानाचे भान ठेवावेच लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. शुक्रवार, १0 जून रोजी सकाळी ११ वाजता मेहरबानू कनिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या ह्यलोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरह्णच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी ते बोलत होते. शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. रणजिप पाटील यांच्याहस्ते फित कापून झाले. प्रमुख अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ललित ट्युटोरिअल्सचे संचालक प्रा. ललित काळपांडे, 'लोकमत' अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले व सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल उपस्थित होते. प्रारंभी श्रद्धेय बाबूजी उपाख्य जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्ज्वलन झाले. पालकमंत्री पुढे म्हणाले की, विद्यार्थी दहावी किंवा बारावी पास झाल्यानंतर घरात आणि मित्रांमध्ये चर्चा होते, ती पुढे कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं? शैक्षणिक क्षेत्रातील विविध वाटा व संधींबाबत बहुतांश पालकांना माहितीच नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांंना योग्य दिशा गवसत नाही. त्यासाठी आजच्या घडीला प्रत्येकाने अपडेट राहणे अत्यंत गरजेचे आहे. चीनसारख्या देशाने तेथील तरुणांना शिक्षणात तर अग्रेसर केलेच, याव्यतिरिक्त त्यांना चरितार्थ चालविण्यासाठी व राष्ट्रनिर्मितीसाठी किमान कौशल्यावर आधारित व्यवसायाच्या नव्या वाटा उपलब्ध करून दिल्या. पाचही जिल्ह्यांतील ६.५ हजार स्थानिक तरुणांना रोजगाराची उपलब्ध होणार असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. एकही क्षण वाया न घालविता आपले ध्येय निश्‍चित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांंना केले. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना निवासी संपादक रवी टाले यांनी सांगितले की, लोकमत समूहाच्यावतीने दरवर्षी राज्यात १४ ठिकाणी अशा पद्धतीने शैक्षणिक प्रदर्शन भरविले जाते. गेल्या काही वर्षात बदलांचा वेग वाढला असून, शिक्षणाच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत. या सर्व बदलांची माहिती विद्यार्थ्यांंना तसेच त्यांच्या पालकांना देण्याच्या दृष्टिकोनातून लोकमतच्यावतीने या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: If you want to know about the future, then you have to keep the awareness of the present- Ranjit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.