देश उन्नत करायचा असेल, तर आधी खेडी उन्नत करणे गरजेचे - डॉ. विजय भटकर
By Atul.jaiswal | Published: February 5, 2018 03:00 PM2018-02-05T15:00:20+5:302018-02-05T17:02:23+5:30
अकोला: देशामध्ये ६ लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले.
अकोला: देशामध्ये ६ लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा प्रतिकुलपती पांडुरंग फुडंकर ,माजी मुख्य सचिव (कृषी ) उमेशचंद्र्र सारंगी तसेच डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला चे कुलगुरु डॉ.विलास भाले व विद्यापीठाचे कुलसचिव कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. विजय भटकर म्हणाले की, भारतात कृषि ऋषी संस्कृती असून, जगातील सर्वात जुने ज्ञानावर आधारीत कृषी संस्कृती आहे. जगातील पहिले विश्वविद्यालय नालंदा विश्वविद्यालय होते. त्यामुळे वैदिक काळात भारताला वैभव प्राप्त होते. परंतू कालांतराने यामध्ये बदल झाला आहे. भारतातला उन्नत राष्ट्र बनवून प्रत्येक महाविद्यालयाने ग्राम पंचायती दत्तक घेवून त्याठिकाणी प्रयोग संशोधन, व आणि नविन उपक्रमासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामुळे गावाची उन्नती होईल. उन्नत भारताच्या उदिष्टासाठी भारतातील प्रमुख शैक्षणिक संशोधन संस्था यांनी ज्ञानांची शक्ती वाढवून त्याशक्तीचा उपयोग गावामध्ये नविन तंत्रज्ञान , पध्दती आणि धोरणाचा वापर करून गावाच्या शाश्वत विकासाला चालना देणे आवश्यक आहे. यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी स्वागतपर प्रास्ताविकातुन विद्यापीठाच्या वाटचालीचा आलेख उपस्थिता समोर मांडला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.यावेळी विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेचे सदस्य माजी कुलगुरु , प्राचार्य, प्राद्यापक,संशोधक,विभाग प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी इच्छाशक्तीद्वारे आव्हानांवर मात करावी - सारंगी
प्रतिकुल परिस्थीतीतही आव्हानाला मात करून आपली इच्छा शक्ती प्रबल करून अधिक आत्मविश्वासाने व सशक्तपणे विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील आयुष्यात उभे राहावे असे प्रतीपादन कृषी विभागाचे माजी मुख्य सचिव उमेशचंद्र सारंगी यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आपला मार्ग स्वत: निवडावा लागेल पुढील आयुष्यात उच्च शिक्षण प्राप्त करणे, संशोधन करणे, कापोर्रोट विभागात काम करणे किंवा पुर्णपणे नवीन मार्ग आपणासाठी खुले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकºयांची परिस्थीती मजबुत करावयाची असेल तर विदयापीठांनी नविन वान , संकरीत बियाणे ,कृषी तंत्रज्ञान व शेतकºयांना परवडण्याजोगे किड व रोगांना नियंत्रण करण्याच्या दृष्टीने संशोधन विकसीत करणे गरजेचे आहे. यासोबतच शेतक-यांना कृषी प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी विदयापीठांनी प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
२६३२ विद्यार्थ्यांना पदवीदान
या पदवीदान समारंभात २६३२ पदवीधरांना पदवीदान करण्यात आले. यात बी.एस.सी. कृषीचे १७७३, बी.एस.सी. उद्यानविद्या १२३, बी.एस.सी.कृषी जैवतंत्रज्ञान १०७, बी.टेक कृषी अभियांत्रिकी १२७, एम.एस.सी.कृषी २३८, आणि पी.एच.डी.च्या ४१ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषकाचे वितरण करण्यात आले.
प्राध्यापकांचा गौरव
उत्कृष्ट शिक्षक म्हणुन डॉ. नारायण मुरलीधर काळे यांना रजत पदक देवुन सन्नमानीत केले. यावेळेस डॉ. बी.ए. सोनुने, डॉ. व्ही. के खर्चे , डॉ. व्ही.व्ही.गभणे, डॉ. एन.एम. कोंडे, डॉ. आर. एन. काटकर, यांना उत्कृष्ठ संशोधन केल्याबद्दल तसेच संशोधन कायार्साठी व विदयापीठ क्षेत्रातील शेतक-यांना तात्काळ पोचविण्यासाठी डॉ.पिके नागरे , डॉ. डी. एच. पैठणकर, डॉ. एकता बागडे, डॉ. व्ही.व्ही. सोनाळकर, व डॉ. एके सदावर्ते यांना रोख पारितोषीक देवुन सन्नमानीत करण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ठ संशोधन केल्याबद्दल डॉ. गुरमित सींग बुट्टर यांना सुवर्ण पदक देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून संजयकुमार किसनराव कुसटकर यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.