आयजी चंद्रकिशोर मीना यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:18 AM2021-05-19T04:18:42+5:302021-05-19T04:18:42+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ६ दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर परिस्थिती कशाप्रकारे आहे याचा आढावा अमरावती ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ६ दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर परिस्थिती कशाप्रकारे आहे याचा आढावा अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी घेतला. तसेच शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी हे वास्तव आहे की यामध्ये काही तफावत आहे, याची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. महानगरपालिका क्षेत्र व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कशाप्रकारे आहे, याचीही माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मीना यांना दिली.
लस घेणे आरोग्यासाठी हिताचे
कोरोनावर एक आशेचा किरण म्हणून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी देण्यात येत आहेत. यापैकी कोणतीही लस घ्या, ती जीव वाचविण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी यावेळी केले. लस घेतल्याने जीव धोक्यात जात नाही, त्यामुळे लस घेणे हे आरोग्यासाठी खूप हिताचे असल्याचेही मीना यांनी स्पष्ट केले.