महाराष्ट्रातील तरुणांमध्ये हिंदीचे अज्ञान भारी !

By admin | Published: September 14, 2014 01:46 AM2014-09-14T01:46:01+5:302014-09-14T01:46:01+5:30

आज हिंदी भाषा दिन : वर्णमाला, लिपी, विद्यापीठाची माहितीच नाही

Ignorance of the youth of Maharashtra is heavy! | महाराष्ट्रातील तरुणांमध्ये हिंदीचे अज्ञान भारी !

महाराष्ट्रातील तरुणांमध्ये हिंदीचे अज्ञान भारी !

Next

विवेक चांदूरकर / अकोला
ह्यमी मराठीह्णचा गाजावाजा करणार्‍या महाराष्ट्रातील तरुण, विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये राष्ट्रभाषा असलेल्या हिंदीविषयी प्रचंड अज्ञान आहे. हिंदी भाषेचा दैनंदिन जीवनात मराठी व इंग्रजीपेक्षा जास्त वापर करण्यात येत असला तरी भाषेबद्दल ज्ञान तोकडेच आहे. तरुणांना लिपी, वर्णमाला, विद्यापीठाची माहिती नसल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या सर्वेक्षनातून उघड झाले आहे.
१४ सप्टेंबर हा संपूर्ण देशभर हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात मायबोली असलेली मराठी आता लोप पावत असल्याची ओरड सर्वत्र होत आहे. यामागे हिंदीचा वापर वाढल्याचे सत्यही आहे. मात्र, बोली व लेखी भाषेत हिंदीचा वापर वाढला असला तरी याबाबत ज्ञान मात्र, तरुण विद्यार्थी, विद्यार्थिनींना अल्पच असल्याचे पुढे आले आहे. मराठी भाषिक हिंदी भाषा बोलण्याला प्राधान्य देतात. बोली भाषेत हिंदीचा वापर वाढला, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स अँपवरही हिंदीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मात्र, हे केवळ ह्यकॉपी पेस्टह्णच असते. हिंदी भाषेबद्दल तरुण पिढी अज्ञानीच आहे. हिंदी भाषेतील वर्णमालेबद्दल ७६ टक्के तरुणांनी चुकीचे उत्तरे दिली तर केवळ २४ टक्के ४८ वर्ण असल्याची योग्य उत्तरे दिली. राजभाषा प्रचार समितीचे मुख्यालय वर्धा येथे असल्याचे २४ टक्के तर हिंदी विद्यापीठ वध्र्याला असल्याचे ५२ टक्के तरुणांना माहिती नाही. हिंदीला राजभाषेचा दर्जा केव्हा मिळाला याबाबत तर ५६ टक्के तरुणांनी चुकीची उत्तरे दिली.

** राजभाषा दिनाबद्दलही अनभिज्ञ
१४ सप्टेंबर रोजी राष्ट्रभाषा दिन साजरा केला जातो. दररोज हिंदी बोलणार्‍या हिंदी भाषिक तरुणांनाही या दिनाबद्दल माहितीच नाही. हिंदी दिन केव्हा साजरा केला जातो व त्यामागील उद्देश काय? याच्या माहितीबद्दल तरुण अनभिज्ञ आहेत.

Web Title: Ignorance of the youth of Maharashtra is heavy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.