अवैध गर्भपाताचा प्रयत्न; आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:34 PM2019-12-29T12:34:02+5:302019-12-29T12:34:10+5:30

आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Illegal abortion attempt; Three-day police custody for the accused! | अवैध गर्भपाताचा प्रयत्न; आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी!

अवैध गर्भपाताचा प्रयत्न; आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी!

Next

अकोला : शिवणी येथील महिला डॉक्टर आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अवैध गर्भपात करत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी महिला डॉक्टरसोबतच तिघांना अटक केली होती. तिन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कुंभारी रोडवरील शिवणी येथे डॉ. रोशनी गावंडे(देशमुख) हिचा दवाखाना असून, तिच्याकडे बीएचएमएसची पदवी आहे. ही डॉक्टर अवैधरीत्या गर्भपात करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी महापालिका आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने शुक्रवारी दुपारी एका गर्भवती महिलेला डॉ. रोशनी गावंडे हिच्याकडे गर्भपात करण्यासाठी पाठविले. यावेळी डॉ. गावंडे हिने या महिलेची तपासणी केली आणि गर्भपातासाठी महिलेकडून दहा हजार रुपये उकळले. शिवाय, दलाल गोपाल माधव गायकवाड((रा. विठ्ठल नगर मोठी उमरी) याच्याकडे पाठविले होते. यानंतर माधवने महिलेला न्यू तापडियानगरातील सुनंदा महादेव आढे (लाजुरकर) हिच्याकडे घेऊन गेला. याठिकाणी सुनंदा आढे हिने महिलेला काही गोळ्या व औषधे दिले आणि महिलेकडून १४ हजार रुपये घेतले. पोलिसांना खात्री झाल्यावर, त्यांनी याठिकाणी छापा घातला आणि डॉ. रोशनी गावंडे हिच्यासह दलाल गोपाल गायकवाड, सुनंदा आढे हिला ताब्यात घेतले. शनिवारी पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले होते.

Web Title: Illegal abortion attempt; Three-day police custody for the accused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.