अकोल्यात ‘स्टेरॉइड इंजेक्शन’च्या गोरखधंद्याचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 11:28 AM2019-08-11T11:28:50+5:302019-08-11T11:28:55+5:30

या छापेमारीत एका ठिकाणावरून ३६ हजार रुपयांचा स्टेरॉइड इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.

Illegal business of 'steroid injection' exposed in Akola | अकोल्यात ‘स्टेरॉइड इंजेक्शन’च्या गोरखधंद्याचा पर्दाफाश

अकोल्यात ‘स्टेरॉइड इंजेक्शन’च्या गोरखधंद्याचा पर्दाफाश

Next

अकोला : युवक व महिलांच्या आरोग्यासाठी प्रचंड घातक असलेल्या ‘स्टेरॉइडच्या इंजेक्शन’ची अवैधरीत्या खुलेआम विक्री करणाऱ्या सिव्हिल लाइन रोडवरील सनी हेल्थ सेंटर आणि या हेल्थ सेंटरच्या संचालकाच्या खोलेश्वर येथील निवासस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री छापेमारी केली. या दोन्ही ठिकाणांवरून आरोग्यास घातक स्टेरॉइड इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
खोलेश्वर येथील रहिवासी याच्या मालकीचे सिव्हिल लाइन रोडवरील सनी हेल्थ एंटरप्रायजेस आणि खोलेश्वर येथील निवासस्थानावरून जीममध्ये जाणाºया युवक व महिलांना बॉडी बनविण्यासाठी स्टेरॉइडचे इंजेक्शन विनापरवानगी तसेच अवैधरीत्या आणि खुलेआम विक्री करीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री सनी हेल्थ सेंटर व त्याच्या निवासस्थानी एकाच वेळी छापेमारी केली. या छापेमारीत एका ठिकाणावरून ३६ हजार रुपयांचा स्टेरॉइड इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. दुसºया ठिकाणावरून ५५ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणावरून या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यासोबतच आरोग्यास घातक असलेले काही औषधे व प्रोटिन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.
 
स्टेरॉइडचे दुष्परिणाम घातक
स्टेरॉइडचे दुष्परिणाम भयंकर असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांनी दिली. स्टेरॉइडच्या इंजेक्शनमुळे महिलांच्या चेहºयावर केस येतात, तर युवकांचे हाड ठिसूळ होणे, किडनीवर परिणाम होणे तर त्यांची जननेंद्रिय कमजोर होण्यासारखे घातक परिणाम होत असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. त्यामुळे युवकांनीच जागृत होऊन अशा प्रकारचे प्रोटिन व स्टेरॉइडचे इंजेक्शन टाळण्याची गरज असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.

 

Web Title: Illegal business of 'steroid injection' exposed in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.