अवैध सावकारी : ४३० धनादेशांसह ३४ लाखांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:51 AM2020-01-22T10:51:39+5:302020-01-22T10:51:47+5:30

शनिवारी रात्री संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनश्यामदास राठी या दोघांचे कार्यालय तसेच निवासस्थानी छापेमारी करून तब्बल ३३ लाख ४० हजार रुपयांची रोख जप्त करण्यात आली.

Illegal creditors: 430 cheques and Cash of Rs 34 lakhs seized in Akola | अवैध सावकारी : ४३० धनादेशांसह ३४ लाखांची रोकड जप्त

अवैध सावकारी : ४३० धनादेशांसह ३४ लाखांची रोकड जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील दोन बड्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीचा व्यवहार सुरू केल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे झाल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनश्यामदास राठी या दोघांचे कार्यालय तसेच निवासस्थानी छापेमारी करून तब्बल ३३ लाख ४० हजार रुपयांची रोख जप्त करण्यात आली. या दोन ठिकाणावरून ४३० धनादेश व खरेदीखतही जप्त करण्यात आले आहेत.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनश्यामदास राठी या दोघांच्या अवैध सावकारी असल्याच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधकांच्या तीन पथकाने तीन दिवस छापेमारी केली. यामध्ये संतोष राठी यांच्या टिळक रोडवरील राजस्थान भवन येथील कार्यालयातून तसेच मराठा नगरातील राजराजेश्वर हाउसिंग सोसायटी या निवासस्थानावरून २४ लाख ९४ हजार ६९७ रुपये रोख ८९ धनादेश तसेच काही खरेदीखत जप्त करण्यात आले. त्यानंतर राजेश घनश्यामदास राठी यांच्या रामनगर येथील आलिशान बंगल्यातून ८ लाख ३४ हजार ५०५ रुपये रोख जप्त करण्यात आले. यासोबतच तब्बल ३४१ धनादेश आणि काही खरेदीखतही जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही राठींकडून धनादेश, चिठ्ठ्या, संगणक आढळले असून, मोठ्या प्रमाणात व्यवहाराचे काही दस्तावेजही असल्याची माहिती आहे. ही झाडाझडती महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात एस. डब्ल्यू. खाडे, एम. एस. गवई, एस. पी. पोहरे यांच्या पथकाने केली. या छापेमारीत दस्तावेज जप्त करण्यात आले असून, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक या प्रकरणात आता काय कारवाई करतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.


आयकर खात्यानेही घालावे लक्ष
संतोष राठी आणि राजेश राठी यांच्याकडे तब्बल ४३० धनादेश, आणि खरेदीखत आढळल्याने या प्रकरणात आयकर खात्यानेही लक्ष घालण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे आयकर खात्याने यामध्ये लक्ष दिल्यास आणखी मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणात तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात सुरू आहे. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडूनही तपास होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Illegal creditors: 430 cheques and Cash of Rs 34 lakhs seized in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला