के. एस. पाटील हॉस्पिटलवर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:04 AM2017-10-13T02:04:19+5:302017-10-13T02:06:05+5:30

श्रावगी प्लॉटस्थित डॉ.के.एस. पाटील हॉस्पिटलवर गुरुवारी अकोला महापालिकेचा गजराज चालला. अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई सकाळी               ८ वाजताचे दरम्यान केली. डॉ. अभय पाटील यांच्या हॉस्पिटलवर झालेल्या कारवाईमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ  उडाली आहे.

illegal encroachment of K. S. Patil hospital | के. एस. पाटील हॉस्पिटलवर चालला गजराज

के. एस. पाटील हॉस्पिटलवर चालला गजराज

Next
ठळक मुद्देमनपाची धाडसी  कारवाई ४३१ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : श्रावगी प्लॉटस्थित डॉ.के.एस. पाटील हॉस्पिटलवर गुरुवारी अकोला महापालिकेचा गजराज चालला. अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई सकाळी               ८ वाजताचे दरम्यान केली. डॉ. अभय पाटील यांच्या हॉस्पिटलवर झालेल्या कारवाईमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ  उडाली आहे.
    टॉवर-रतनलाल प्लॉट मार्गावरील स्कायलार्क हॉटेलजवळच्या श्रावगी प्लॉटस्थित डॉ.के.एस. पाटील यांचे हॉस्पिटल आहे. अस्थीरोग तज्ज्ञ अभय पाटील आणि स्त्रीरोग तज्ज्ञ रेखा पाटील या हॉस्पिटलमध्ये रूग्णसेवा देतात. पाटील यांच्या नझुल शिट क्रं.५२ , नझुल भूखंड क्रं.६/२ मध्ये एकूण १0४५ चौरस मीटर मंजूर नकाशा आहे. मात्र प्रत्यक्षात पाटील यांनी १४७६ चौरस मीटर बांधकाम केलेले आहे. यासंदर्भात २0१५ पासून त्यांना नोटिस दिल्या गेल्यात; परंतु त्याची दखल पाटील यांनी घेतली नाही, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली. ४३१ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत असल्याचे समोर आल्याने मनपा प्रशासनाने गुरुवारी सकाळी दोन जेसीबी लावून ही कारवाई केली. ठाणेदार अन्वर शेख पोलीस ताफ्यासह येथे हजर होते. 
मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपायुक्त डॉ. दीपाली भोसले, उपायुक्त समाधान सोळंके, विभागीय अधिकारी अनिल बिडवे, राजेंद्र घनबहादूर, संदीप गावंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अतिक्रमित टीनशेड जमीनदोस्त करण्यात आले असून शेजारील औषधी दूकानांचे बांधकाम पाडण्यात आले. 

स्वत:च पाडले फुलारी
गल्लीतील अतिक्रमण 
अकोला शिट क्रं.३९ बी.नझुल प्लॉट क्रं.२३६ मोहम्मद अली चौकातील फुलारी गल्लीमध्ये अफसर खान तालेबान खान यांचे अनधिकृ त बांधकाम आहे. सै. याकूब सै. कासम आणि सै. कासम सै. लतिफ यांनी या अनधिकृत बांधकामाची तक्रार  मनपात केली होती. अतिक्रमण हटाव पथक कारवाईसाठी येत असल्याचे कळताच खान परिवाराने स्वत:हून अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे मनपा प्रशासनाने कारवाई केली नाही.
-

Web Title: illegal encroachment of K. S. Patil hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.