माेर्णा नदीच्या पूरसंरक्षण भिंतीचे अवैधरीत्या खाेदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 07:22 PM2021-01-01T19:22:10+5:302021-01-01T19:25:40+5:30
Morna River flood protection wall ही भिंत पडल्यास गीतानगर भागातील नागरिकांच्या जिवाला धाेका निर्माण हाेण्याची दाट शक्यता आहे.
अकाेला : गीतानगर परिसरात माेर्णा नदीला पूर आल्यास मातीचा माेठा भराव घालून पूरसंरक्षण भिंत उभारण्यात आली हाेती. या भिंतीचे मागील काही दिवसांपासून अवैधरीत्या खाेदकाम केले जात असून, यामुळे स्थानिक रहिवाशांना धाेका निर्माण झाला आहे. या प्रकाराची तातडीने दखल घेण्याची मागणी माजी महापाैर मदन भरगड यांनी शुक्रवारी (दि.१) जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
माेर्णा नदीला पूर आल्यास पुराच्या पाण्याचा गीतानगर भागात शिरकाव हाेऊन स्थानिक रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत हाेता. ही बाब लक्षात घेता शासनाने कोट्यवधी रुपयांची तरतूद व खर्च करून माेर्णा नदीच्या काठावर माेठी पूरसंरक्षण भिंत बांधली. परंतु सध्या येथील पूरसंरक्षण भिंतीची माती जेसीबीने खोदून इतरत्र नेण्यात येत आहे. यामुळे ही पूरसंरक्षण भिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही भिंत पडल्यास गीतानगर भागातील नागरिकांच्या जिवाला धाेका निर्माण हाेण्याची दाट शक्यता आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन जेसीबीने माती खोदणाऱ्या व्यक्तींविराेधात तातडीने कारवाई करण्याची मागणी माजी महापाैर भरगड यांनी पत्राद्वारे केली आहे.