मनात्री शिवारात मातीचे अवैध उत्खनन जोरात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:58 AM2021-01-08T04:58:27+5:302021-01-08T04:58:27+5:30
तेल्हारा तालुक्यातील मनात्री शिवारात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत. वीटभट्ट्या शेताच्या बाजूला असल्याने वीटभट्टीमालक दररोज शेकडो ब्रॉस मातीचे अवैध उत्खनन ...
तेल्हारा तालुक्यातील मनात्री शिवारात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत. वीटभट्ट्या शेताच्या बाजूला असल्याने वीटभट्टीमालक दररोज शेकडो ब्रॉस मातीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भरदिवसा अवैध उत्खनन सुरू असूनही महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
शेतकऱ्यांना शेती न परवडणारी झाली आहे. दरवर्षी नापिकी होत असल्याने शेतकरी संकटात आहेत. अशातच वीटभट्टी मालक शेताच्या शेजारी मातीचे अवैध उत्खनन करीत असल्याने पावसाळ्यात शेती खरडून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वीटभट्टीमालकांना वारंवार सांगूनही मातीचे खोदकाम सुरूच आहे. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मातीचे अवैध उत्खनन करणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. निवेदनावर अनिल गवारगुरू, बाबाराव गवारगुरू, संजय गवई, रमूताई इंगळे, जगदीश गवारगुरू, प्रदीप गवई, जयदेव गवारगुरू, संजय गवारगुरू, विठ्ठल डायलकर, लक्ष्मण डायलकर, प्रवीण गवारगुरू आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (फोटो
-------------------------
मनात्री येथील गैरप्रकाराची माहिती प्राप्त झाली असून, यासंदर्भात चौकशी करून कारवाई करू
- ओमप्रकाश वेरूळकर, तलाठी, मनात्री