पिंपरी, आलेगाव शिवारात वृक्षांची अवैध कत्तल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:19 AM2021-04-27T04:19:30+5:302021-04-27T04:19:30+5:30
वनविभागासह व जि.प. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतरही कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवारातून साेमवारी वृक्षांची कत्तल करून गोळा ...
वनविभागासह व जि.प. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतरही कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवारातून साेमवारी वृक्षांची कत्तल करून गोळा केलेल्या लाकडांचे ओंडके एमएच ४३ ई ६०६३ क्रमांकाच्या ट्रकमधून भरून नेण्यात आले. दिवासाढवळ्या वृक्षांची कत्तल करून लाकडे लांबविली जात असल्याचे दिसत आहे. कारवाई होत नसल्याने, वृक्षाची कत्तल करण्याची हिंमत वाढली आहे.
या सोबतच वणी, आलेगाव, पिंपरी डिक्कर रस्त्यावर जि.प. बांधकाम विभागाच्या हद्दीतील वृक्षांची कटाई करून वृक्षांची लाकडे घेऊन ट्रक पसार झाला. या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वणी वारुळा, आलेगाव, पिंपरी डिक्कर येथील नागरिकांनी केली आहे.
फोटो : मेल फोटोत
जि.प. बांधकाम उपविभाग हद्दीतील वृक्षांची अवैध कत्तल केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तहसीलदार, पोलीस व जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
- इंगळे, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग अकोट
वृक्षांची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तक्रार प्राप्त झाल्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.
- अजय बावणे, वनविभाग अकोट वनक्षेत्र