आरक्षित मैदानावर बेकायदेशीर गुंठेवारी!

By admin | Published: May 26, 2014 12:36 AM2014-05-26T00:36:15+5:302014-05-26T01:14:23+5:30

आरक्षित मैदानावर बेकायदेशीररीत्या गुंठेवारी मंजूर करून रस्ता बांधण्यात येत असल्याची तक्रार.

Illegal gundhae on the reserved ground! | आरक्षित मैदानावर बेकायदेशीर गुंठेवारी!

आरक्षित मैदानावर बेकायदेशीर गुंठेवारी!

Next

अकोला : रामनगरातील आरक्षित मैदानावर बेकायदेशीररीत्या गुंठेवारी मंजूर करून रस्ता बांधण्यात येत असल्याची तक्रार परिसरातील नागरिक आणि नगरसेवकाने महानगरपालिका आणि नगर रचना विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे, हा भूखंड सांस्कृतिक भवन आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. मनपा प्रशासनाने सध्या शहरातील अवैध बांधकामाविरुद्ध बडगा उगारला असतानाच आता आरक्षित मैदानावर गुंढेवारीने प्लॉट पाडून त्यात रस्ता बांधण्यात येत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याबाबत प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार केली. मौजे उमरखेड (रामनगर) येथील शेत सर्व्हे नं. ५ मध्ये १ ते १४ आर एवढी शेत जमीन विकास आराखड्यानुसार (डी.पी. प्लॅन) आरक्षित आहे. डी.पी. प्लॅनमध्ये आरक्षित भूखंड (ईपी) क्रमांक १९ व १२ नुसार ही जागा सांस्कृतिक भवन व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असल्याचे दर्शविली आहे. शासनाकडून आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. उपरोक्त भूखंडावर पुरातन काळा मारोती मंदिर आहे. रामनगरातील रहिवाशांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात मनपालाही प्रतिवादी करण्यात आले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही गैरकायदेशीररीत्या गुंठेवारी भूखंडाचा नकाशा कसा मंजूर करण्यात आला, असा सवालही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या भूखंड गुंठेवारीची प्रक्रिया रद्द करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Illegal gundhae on the reserved ground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.