हॉटेलमधील अवैध दारु अड्ड्याचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:06 PM2020-09-21T17:06:15+5:302020-09-21T17:06:24+5:30
रविवारी रात्री उशिरा छापा टाकून या हॉटेलमधून तब्बल १९ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्क चौकातील जय शंकर हॉटेलमध्ये देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री तसेच याच हॉटेलमध्ये दारू पिण्याची व्यवस्था करीत अवैध अड्डाच सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने रविवारी रात्री उशिरा छापा टाकून या हॉटेलमधून तब्बल १९ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हॉटेल जय शंकरचा मालक लखमीचंद शंकरलाल रोहडा हा त्याच्या हॉटेलमधून देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री करून तसेच दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करीत मोठा अड्डाच चालवीत असल्याच्या माहितीवरून पथकाने या हॉटेलमध्ये छापा टाकून सुनील हशमतराय फतनानी ४० रा.सिंधी कॅम्प,अहमद खान युसूफ खान २८ वर्षे रा.नुराणी मशीदजवळ खदान, जयकुमार हशमतराय फतनाणी ३६ रा.कच्ची खोली सिंधी कॅम्प, अजहर खान फरीद खान ३२ वर्षे रा.बैदपुरा, अनवर खान आबीद खान ३७ वर्षे रा.नुराणी मशीदजवळ खदान, सदाम खान रसूल खान २८ वर्षे रा.बैदपुरा, महेश रेवाचंद फतनाणी ३८ वर्षे रा.कच्ची खोली सिंधी कॅम्प, समीर खान मोहमंद अख्तर खान २० वर्षे रा.लालबंगला बैदपुरा, शेख अजीम शेख रहीम ३१ वर्षे रा.जिराबावडी खदान, इस्लामोद्दीन सलामोद्दीन २९ वर्षे रा.जिराबावडी खदान, साजन ताराचंद जेठाणी ४० वर्षे रा.पक्की खोली सिंधी कॅम्प, वैभव ज्ञानेश्वर उमक २८ वर्षे रा.लोकमान्य नगर, शिवसेना वसाहत, महेंद्र नानकराम नानवाणी ४२ वर्षे रा.पक्की खोली सिंधी कॅम्प, मोईनोद्दीन इजाजोद्दीन २५ वर्षे रा.जिराबावडी खदान, संतोष नामदेवराव खडसान ४८ वर्षे रा.व्ही एच बी कॉलनी, अनिस शेख खालीद शेख ४२ वर्षे रा.उत्तरचंद प्लॉट तार फाइल, नरेंद्र बाबूलाल गंगाधरे ४५ वर्षे रा.व्ही एच बी कॉलनी तारफैल, संजय केशवराव म्हैसने ४४ वर्षे रा. तारफैल भवानी पेठ, लखमीचंद शंकरलाल रोहडा वय ५९ वर्ष रा.कच्ची खोली सिंधी कॅम्प यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ लाख ९४ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर हॉटेलचालक नामे लखमीचंद शंकरलाल रोहडा याच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.