सात लाख रुपयांची अवैध दारू जप्त
By admin | Published: April 12, 2017 02:10 AM2017-04-12T02:10:12+5:302017-04-12T02:10:12+5:30
अकोला: पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये अवैध दारू विक्रीविरुद्ध १ ते १0 एप्रिलदरम्यान आॅपरेशन क्रॅकडाऊन राबविण्यात आले.
अकोला: पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये अवैध दारू विक्रीविरुद्ध १ ते १0 एप्रिलदरम्यान आॅपरेशन क्रॅकडाऊन राबविण्यात आले. आॅपरेशनदरम्यान पोलिसांनी जिल्ह्यातील ७३ ठिकाणच्या अवैध दारू अड्ड्यांवर, हातभट्टींसह देशी, विदेशी दारू विक्रेत्यांवर छापा घालून एकूण ७ लाख ३६ हजार ७0९ रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
जिल्ह्यात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत आॅपरेशन क्रॅकडाऊन राबविण्यात आले. दहा दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी अवैधरीत्या गावठी दारू व हातभट्टीवर छापा घालून ७ हजार ७९५ लिटर दारू जप्त केली.
या दारूची किंमत ३ लाख ८८ हजार ३४५ रुपये आहे, तसेच देशी व विदेशी दारू अवैधरीत्या बाळगणाऱ्या १२८ ठिकाणी छापे घालून ५ हजार ३४२ देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत ३ लाख ४८ हजार ३६४ रुपये आहे.