अवैध दारूची वाहतूक; चौघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2017 02:46 AM2017-03-27T02:46:16+5:302017-03-27T02:46:16+5:30

९९ हजार रुपयांचा ऐवज जप्त, उरळ पोलिसांची कारवाई.

Illegal liquor transport; Action on four | अवैध दारूची वाहतूक; चौघांवर कारवाई

अवैध दारूची वाहतूक; चौघांवर कारवाई

googlenewsNext

उरळ (अकोला), दि. २६- पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारूची वाहतूक करणार्‍या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून दारूसह ९९ हजार रुपयांचाऐवज जप्त करण्यात आला आहे. कारंजा रमजानपूर फाट्यावर एकजण दारू घेऊन दुचाकी क्र. एमएच १५ सीयू २३५६ ने जात असल्याची माहिती उरळ पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुचाकी थांबवून विक्रम देवधर गवई याची झडती घेतली. त्याच्याकडून ९९ क्वार्टर देशी दारू व दुचाकी असा २४,८00 रुपयांचा ऐवज जप्त केला. व्याळा येथील संदीप विनायक कात्रे हा मनाली येथे अवैध दारू घेऊन जात असताना पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्याकडून दुचाकी एमएच ३0 एक्यू ९२0५, दारू असा ३५,७६0 रुपयांचा ऐवज जप्त केला. गायगाव बसस्थानकावर दारूची वाहतूक करणार्‍या विजय लक्ष्मण इंगळे व प्रफुल्ल प्रकाश अवचार यांना उरळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४४ देशी दारूचे क्वार्टर व दुचाकी क्र. एमएच ३0 डब्ल्यू ६0९५ असा ३८,६४0 रुपयांचा ऐवज जप्त केला. चार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात एएसआय हरिदास काळे, जमादार दादाराव लिखार, पो.काँ. प्रवीण मोरे, राम आंबेकर आदींनी केली.

Web Title: Illegal liquor transport; Action on four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.