लाकडाची अवैध वाहतुक, १.७0 लाखाचा माल जप्त

By admin | Published: May 1, 2016 01:11 AM2016-05-01T01:11:56+5:302016-05-01T01:11:56+5:30

जुने शहर पोलिसांची कारवाई, लाकडाचा ट्रक वनविभागाच्या स्वाधीन.

Illegal logistics, 1.70 lakhs of goods seized | लाकडाची अवैध वाहतुक, १.७0 लाखाचा माल जप्त

लाकडाची अवैध वाहतुक, १.७0 लाखाचा माल जप्त

Next

अकोला: लाकडाची अवैध वाहतुक करणारा ट्रक शनिवारी सकाळी जुने पोलिसांनी पकडला. लाकूड भरलेला ट्रक पोलिसांनी वनविभागाच्या ताब्यात दिला. वनविभागाने ट्रकसहित ट्रकमधील १.७0 लाखाचे लाकूड जप्त केले. जुने शहर पोलिसांनी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
शनिवारी सकाळी महरूख लाकडाने भरलेला एमएच ३0 सीबी 0७७0 क्रमांकाचा ट्रक पातूर रोडकडून शहराकडे येत होता. गस्तीवर असलेल्या जुने शहर पोलिसांनी हा ट्रक हिंगणाजवळील पेट्रोलपंपाजवळ पकडला. ट्रकचालकाजवळ लाकडासंबधीचे कागदपत्र उपलब्ध नसल्याने, पोलिसांनी लाकडासहीत ट्रक जप्त केला आणि वनविभागाच्या ताब्यात दिला. चालकाची चौकशी केल्यानंतर तो ट्रकमध्ये अवैध लाकूड भरून नेत असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी ट्रकचालक असलम खान अकबर खान (रा. पुसद जि. यवतमाळ) याच्याविरूद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चालकाविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वनविभागाने ट्रक व ट्रकमधील लाकूड जप्त केले असून, पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Illegal logistics, 1.70 lakhs of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.