चक्क किराणा दुकानातुन सुरु होती देशी दारुची अवैध विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 07:34 PM2021-02-06T19:34:34+5:302021-02-06T19:34:56+5:30
Crime News उमेश किराणा दुकानातून पाेलीसांनी दारुचा साठा जप्त केला असून, एकास दारु विकताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
अकाेला : पिंजर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कानडी बाजार येथे एका किराणा दुकानातून देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री सुरु असल्याच्या माहीतीवरून दहशतवाद विराेधी पथकाने शनिवारी छापा टाकला. उमेश किराणा दुकानातून पाेलीसांनी दारुचा साठा जप्त केला असून एकास दारु विकताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
दहशतवाद विरोधी पथक पिंजर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार शोधण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना कानडी येथील उमेश कीराणा दुकानातून देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री करण्यात येत असल्याची माहीती मीळाली. या माहीतीवरून दहतवाद विराेधी पथकाचे प्रमूख विलास पाटील यांनी छापा टाकला. त्यानंतर कीराणा दुकानाची झडती घेतली असता त्यामधून ४० बाॅटल दारु जप्त करण्यात आली. कीराणा दुकानातून देशी व विदेशी दारुची विक्री सुरु असताना पींजर पाेलीसांची त्याला मुकसंमती असल्याचेच समाेर येत आहे. या प्रकरणी दारुची अवैधरीत्या विक्री केल्याप्रकरणी अशोक भीकाजी पवार रा कानड़ी यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाइ दहतशवाद विराेधी पथकाने केली.