अवैध रेती वाहतूकप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:27 PM2017-11-20T22:27:20+5:302017-11-20T22:38:49+5:30

अकोट: अवैधरीत्या रेती वाहतुकीच्या दोन प्रकरणात अकोट शहर पोलीस  स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध २0 नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल करून एक ट्रॅक्टर व दोन ब्रास  रेती जप्त करण्यात आली आहे. 

Illegal sand transport cases filed against three! | अवैध रेती वाहतूकप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल!

अवैध रेती वाहतूकप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल!

Next
ठळक मुद्देअकोट शहर पोलिसांची कारवाईएक ट्रॅक्टर व दोन ब्रास रेती जप्त 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: अवैधरीत्या रेती वाहतुकीच्या दोन प्रकरणात अकोट शहर पोलीस  स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध २0 नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल करून एक ट्रॅक्टर व दोन ब्रास  रेती जप्त करण्यात आली आहे. 
तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी नरेश रतन व रेखा गुजरकर  यांनी विविध ठिकाणी गौण खनिज पकडले. या प्रकरणी अकोट शहर पोलिसात  आरोपी शेख इसाक शे. अशरफ रा. मोहाळा याच्याकडून गफ्फूरवाला प्लॉट येथे १  ब्रास रेती व ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. तसेच खाई नदीपात्रातून आरोपी आकाश  दिलीप लायसे, संजय उत्तम तायडे रा. राहुल नगर या दोघांकडून १ ब्रास रेती जप्त  करण्यात आली. या प्रकरणी  तलाठी नरेश रतन व रेखा गुजर यांच्या फिर्यादीवरून  उपरोक्त आरोपींविरुद्ध गौण खनिज अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले  आहेत. 

Web Title: Illegal sand transport cases filed against three!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.