अवैध सागवन जप्त
By admin | Published: January 7, 2015 12:29 AM2015-01-07T00:29:23+5:302015-01-07T00:29:23+5:30
बुलडाणा तालुक्यात वनविभागाने केले १0 हजारांचे अवैध सागवन जप्त.
बुलडाणा : तालुक्यातील बिरसिंगपूर परिसरात वनविभागाने रचलेल्या सापळ्यात १0 हजारांचे अवैध सागवन जप्त केल्याची कारवाई ५ जानेवारी रोजी केली. वनविभागाचे सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी डी.आर. पाटील व उपवनसंरक्षक ई.पी.सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथक प्रमुख पी.एस. राऊत, नालिंदे, लहासे, वाळ, कमलाकर चव्हाण, संदीप मोरे, संदीप मडावी यांनी बिरसिंगगपूर परिसरातील दत्तपूर देऊळघाट पाऊलवाटेवर नाकाबंदी केली. यावेळी अज्ञात ५ चोरट्यांकडून १३ सागवान नग किंमत १0 हजार रुपये जप्त केले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि १९२७ चे २६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वनपाल पी.एस. राऊत करीत आहेत.
त्याचप्रमाणे धाड परिसरात वृक्षांची होणारी अवैध कत्तल आणि तस्करीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात फोफावत आहे. वनविभागाच्या फिरत्या पथकाने ६ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईत धाड-धामणगाव मार्गावर अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर व लाकूड जप्त केला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली.