जनुना, पातूर नंदापूर परिसरात अवैध धंदे फोफावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:17 AM2021-02-07T04:17:21+5:302021-02-07T04:17:21+5:30
पिंजर पोलीस ठाणेअंतर्गत गेल्या चार महिन्यांपासून अवैध धंदे करणाऱ्यांना पिंजर पोलिसांनी रान मोकळे करून सोडले आहे. पोलीस अधीक्षकांचे पथक, ...
पिंजर पोलीस ठाणेअंतर्गत गेल्या चार महिन्यांपासून अवैध धंदे करणाऱ्यांना पिंजर पोलिसांनी रान मोकळे करून सोडले आहे. पोलीस अधीक्षकांचे पथक, दहशतवाद विरोधी पथकाच्या वारंवार धाडी या भागात होतात. परंतु, स्थानिक पोलीस मात्र, कोणतीही कारवाई करीत नाहीत. पोलीस अधीक्षकांचे पथक नसते, तर पिंजर पोलिसांनी आठवडी बाजारातील जुगार अड्ड्याला परवानगी दिली असती. अशी चर्चा आहे. जनुना आणि खोपडी, गावाजवळ ऐन रहदारीच्या रस्त्यावर, विद्यालयाजवळ बावन्न तास पत्त्यांचा जुगार आणि वरली मटका सुरू असल्याची माहिती आहे. खोपडी, पातूर नंदापूर, घोटा, कानडी, सालपी, आदी ठिकाणी वरली मटक्याचे अड्डे सुरू आहेत. देशी आणि गावठी दारू अड्डेसुद्धा वाढले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध तक्रार द्यावी. आम्ही निश्चितच कारवाई करू. अनेक ठिकाणी झाडाझडती घेतली; परंतु तेथे काही मिळून आले नाही. अवैध धंद्यांची माहिती मिळाल्यास, ठोस कारवाई करण्यात येईल.
एम. एन. पडघान, ठाणेदार पिंजर