दारुची अवैध वाहतुक : मद्यसम्राट राजु जयस्वालसह तिघांविरुध्द कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:10 PM2019-01-30T12:10:51+5:302019-01-30T12:12:02+5:30

अकोला - देशी व विदेशी दारुची विक्री करण्यासाठी परवाणा असल्याच्या नावाखाली खेडयापाडयात तसेच शहरातील ढाब्यांवर बॉक्सच्या बॉक्सने देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री आणि वाहतुक करणाऱ्या मद्यसम्राट राजु जयस्वालसह तिघांविरुध्द जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी मंगळवारी रात्री उशीरा कारवाई केली.

The illegal traffic of alcohol: Action against the three persons including liquor baron Raju Jaiswal | दारुची अवैध वाहतुक : मद्यसम्राट राजु जयस्वालसह तिघांविरुध्द कारवाई

दारुची अवैध वाहतुक : मद्यसम्राट राजु जयस्वालसह तिघांविरुध्द कारवाई

Next

अकोला - देशी व विदेशी दारुची विक्री करण्यासाठी परवाणा असल्याच्या नावाखाली खेडयापाडयात तसेच शहरातील ढाब्यांवर बॉक्सच्या बॉक्सने देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री आणि वाहतुक करणाऱ्या मद्यसम्राट राजु जयस्वालसह तिघांविरुध्द जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी मंगळवारी रात्री उशीरा कारवाई केली.
रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संतोषी माता मंदीर चौक परिसरातून मोठी उमरी येथील रहिवासी शुध्दोदन नथ्थुजी वाठोरे व पीकेव्ही कॉलनी मलकापूर परिसरातील रहिवासी नितीन श्रीकृष्ण दिवनाले हे दोघे जन एमएच ३० एपी ४७०१ क्रमांकाच्या दुचाकीवर टॅँगो पंच आणि सुखा संत्रा या देशी दारुची बॉक्सची अवैधरीत्या वाहतुक करीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने सदर दोघांवर पाळत ठेउन संतोषी माता मंदिर परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून देशी दारुसह ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांविरुध्द रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असतांनाच मद्यसम्राट राजु जयस्वाल याने सदरचा दारु साठा स्वताचा असल्याचे सांगत त्यासाठी परवाणाही असल्याचे पोलिसांना सांगीतले. मात्र बॉक्सने दारु विक्रीचा परवाणा असेल तर तो पोलीस अधीक्षक कार्यालयात आणुण देण्याचे सांगताच जयस्वाल याने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. पोलिसांनी सुरुवातील सदर दारुची वाहतुक करणाºयांविरुध्द गुन्हा दाखल केला मात्र रात्री उशीरा मद्यसम्राट राजु जयस्वाल याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

तीन मद्यसम्राटांचा हैदोस सुरुच
जिल्हाभर तीन मद्यसम्राटांचा हैदोस सुरु असतांना केवळ विशेष पथकानेच या मोठया मद्यसम्राटांवर कारवाई करण्याचे धाडस केले आहे. संबधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दारुची अवैध विक्री आणि वाहतुक सुरु असतांना या मद्यसम्राटांच्या रोजंदारीवर असलेल्या मानसांवर कारवाई करण्यात येत नसल्याने पोलिस ठाण्यातील डीबी पथक आणि दारु विक्रेत्यांचे मधूर संबध उघड होत आहेत.

परवाणा घेउन येण्याचे टाळले
दारु विक्रीचा परवाणा असल्यामुळे पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न राजु जयस्वाल याने केला. मात्र पोलिसांना परवाणा सादर करण्याचे सांगताच जयस्वाल यांनी पोलिस ठाणे तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयात परवाणा घेउन येण्याचे टाळल्याची माहिती सुत्रांनी दिली. यावरुन बॉक्सने दारुची अवैधरीत्या विक्री होत आहे.

 

Web Title: The illegal traffic of alcohol: Action against the three persons including liquor baron Raju Jaiswal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.