पाच बैलांची अवैध वाहतूक , बैलांसह मेटाडोर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2016 01:22 AM2016-07-05T01:22:50+5:302016-07-05T01:22:50+5:30
हिवरखेड पोलिसांनी कारवाई; सातपुड्याच्या जंगलातून हिवरखेडकडे येत होते वाहन.
हिवरखेड (जि. अकोला) : सातपुड्याच्या जंगलातून हिवरखेडकडे येत असलेल्या एका मेटाडोरमधून पाच बैलांना कोंबून आणण्यात येत असल्याचे आढळून आल्याने हिवरखेड पोलिसांनी पाच बैलांसह मेटाडोर जप्त केल्याची घटना ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास झरी गेटजवळ घडली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वान परिक्षेत्रांतर्गत असलेल्या झरी गेटजवळ वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश खराटे हे सोमवारी सकाळी गस्तीवर असताना त्यांना झरी गेटमधून एम.एच. ३0 ए.बी.१९८२ क्रमांकाच्या मेटाडोरमध्ये पाच बैलांना कोंबून नेण्यात येत असल्याचे आढळले. त्यांनी सदर वाहनाची तपासणी केली असता चालकाकडे बैलांची वाहतूक करण्याचा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे वनाधिकार्यांनी सदर मेटाडोरमध्ये असलेले चिचारी येथील अब्दुल शरीफ अब्दुल लतिफ व अजरोद्दीन ग्यासोद्दीन यांच्याकडून बैलांसह वाहन जप्त करून हिवरखेड पोलिसांच्या ताब्यात दिले.हवालदार हितेश कांबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त दोघांविरूद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अब्दुल शरीफ अब्दुल लतिफ व अजरोद्दीन ग्यासोद्दीन यांना अटक केली.या गुन्ह्याचा तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे करीत आहेत.