रेतीची अवैध वाहतूक जोरात; महसूल विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:28 AM2021-02-23T04:28:03+5:302021-02-23T04:28:03+5:30
वल्लभनगर: निंभोरा परिसरात पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष ...
वल्लभनगर: निंभोरा परिसरात पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाच्या मूकसंमतीने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
सध्या वल्लभनगरसह निंभारा, हिंगणा, तामसवाडी, कासली, सांगवीबाजार परिसरात बांधकामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे या भागात रेती माफियांकडून रेतीचा पुरवठा होत आहे. पूर्णा नदीपात्रातून अवैध उत्खनन करून रेतीची दिवसरात्र वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने, रेतीमाफियांकडून रेती अव्वाच्या सव्वा भावात विक्री करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर, लाखो रुपयांच्या महसूलला चुना लागत असल्याचे चित्र आहे. पूर्णा नदीपात्रात उत्खनन होत असल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रेती माफियांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-------------------------
रात्रंदिवस वाहतूक सुरूच
पूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षतेमुळे रेती माफिया दिवसाढवळ्या रेतीची अवैध वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. दररोज शेकडो ब्रास रेतीची चोरी होत असल्याचे चित्र आहे.
--------------------------