वाळूची अवैध वाहतूक; ट्रॅक्टर जप्त, १.१५ लाख रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:31 PM2019-10-14T18:31:19+5:302019-10-14T18:31:30+5:30
वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करुन, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आला.
अकोला : म्हैसांग येथील वाळू घाटातून वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त करुन, ट्रॅक्टर मालकास १ लाख १५ हजार ८३३ रुपये दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड यांनी सोमवारी केली.
जिल्हास्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथक गस्तीवर असताना, १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अकोला तालुक्यातील म्हैसांग येथील वाळू घाटातून एक ब्रास वाळूची अवैध वाहतूक करताना एक विनाक्रमांक ट्रॅक्टर आढळून आला. वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करुन, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आला. टॅÑक्टर मालकास १ लाख १५ हजार ८३३ रुपये दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड यांनी केली. दंडाची रक्कम वसूल करण्याची कारवाई अकोला तहासीलदारांमार्फत करण्यात येणार असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी सांगीतले.