अकोटात गौण खनिजाची अवैध वाहतूक, वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:20 AM2021-01-03T04:20:27+5:302021-01-03T04:20:27+5:30

अकोट येथील टिप्पर एमएच ३० एव्ही १२४८ वाहनाने ३ ब्रास मुरूम वाहतूक करताना आढळले. यावेळी वाहन चालक दीपक ...

Illegal transport of secondary minerals in Akota, vehicle confiscated | अकोटात गौण खनिजाची अवैध वाहतूक, वाहन जप्त

अकोटात गौण खनिजाची अवैध वाहतूक, वाहन जप्त

Next

अकोट येथील टिप्पर एमएच ३० एव्ही १२४८ वाहनाने ३ ब्रास मुरूम वाहतूक करताना आढळले. यावेळी वाहन चालक दीपक बाबूलाल रावते रा. पोपटखेड यांच्याकडे गौण खनिज परवाना होता, मात्र एकाच परवान्यावर वेळेचे बंधन न पाळता दोनदा वाहतूक करण्याची दाट शक्यता असल्याचे महसूल पथकाला प्रथम दर्शनी दिसले. विशेष म्हणजे चालकाकडे परवाना नसल्याचे समाेर आले. वाहनाच्या वाहन क्षमतेत वाढ केल्याचा संशय पथकाला आला. चालकाने तसे बयाण दिले आहे. या टिप्परचा पंचनामा करून शहर पोलीस स्टेशन अकोट यांचेकडे सुपुर्दनाम्यावर वाहन सोपवण्यात आले आहे.

ही कारवाई नायब तहसीलदार हरीश बजरंग गुरव, तलाठी गोपाल वानरे, राजाभाऊ खामकर, विशाल शेरेकर यांनी केली. पुढील कारवाईकरिता तहसीलदार नीलेश मडके यांना अहवाल सादर केला आहे.

Web Title: Illegal transport of secondary minerals in Akota, vehicle confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.