चोहोट्टा परिसरात रेतीची अवैध वाहतूक; ६३ हजारांचा दंड
By admin | Published: July 15, 2017 01:38 AM2017-07-15T01:38:37+5:302017-07-15T01:38:37+5:30
चोहोट्टा बाजार: परिसरात अवैध गौण खजिन उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून महसूल विभागाने ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोहोट्टा बाजार: परिसरात अवैध गौण खजिन उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून महसूल विभागाने ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या पिलकवाडी परिसरात नदीपात्रातून अवैध प्रकारे रेतीचे उत्खनन होत असल्याची माहिती तलाठी विनायक मालवे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्र.एमएच ३० एबी ९०८०चा चालक सागर इंगळे व ट्रॅक्टर क्र.एमएच ३० एबी ५५९२ चा चालक शिवदीप नारे यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच अकोट मार्गावर रेतीची अवैध वाहतूक करीत असलेल्या पंकज वानखडे व अक्षय वाघ यांच्यावरही कारवाई करण्यात आली. चारही ट्रॅक्टर मालकांकडून ६३ हजार ३३२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई तलाठी विनायक माळवे व महसूल मित्र किशोर राठोड यांनी केली.