रेतीची अवैध वाहतूक ; ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:18 AM2021-04-11T04:18:45+5:302021-04-11T04:18:45+5:30
पांढुर्णा परिसरात ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पातूरचे तहसीलदार दीपक बाजड, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ...
पांढुर्णा परिसरात ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पातूरचे तहसीलदार दीपक बाजड, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश नावकार यांनी संयुक्त सापळा रचून संतोष देवकते यांचा (एमएच ३० एझेड ९०७४) क्रमांकाचा ट्रॅक्टर रेतीने भरलेला जप्त केला. रात्री उशिरापर्यंत चान्नी पोलीस स्टेशनमध्ये चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
--------------------------------------------------
खापरवाडी येथे संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा
वरुर जऊळका : येथून जवळच असलेल्या खापरवाडी बु. येथे संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे व्यासपीठ नेतृत्व हभप अवधूत महाराज पारसकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक हभप गणेश महाराज शेटे यांच्याकडे होते. या हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सांगताच्या दिवशी काल्याचे कीर्तन हभप वासुदेव महाराज खोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता पाटील ओळंबे, मनीष निखाडे, प्रवीण ओळंबे, नंदू कौलखेडे, हरिदास बोदडे, शुभम वाकोडे, ऋषीकेश वाघमारे यांनी परिश्रम घेतले. (फोटो)