‘आयएमए’ने पाळला काळा दिवस; अकोला शहरातील ६५० डॉक्टरांचे दवाखाने राहिले बंद

By Atul.jaiswal | Published: January 2, 2018 03:28 PM2018-01-02T15:28:45+5:302018-01-02T15:34:42+5:30

अकोला: आंदोलनात अकोला आयएमएनेही सहभाग घेतला असून, शहरातील ६५० पेक्षाही अधिक डॉक्टरांचे दवाखाने सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद राहिले. त्यामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली.अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास यामधून वगळण्यात आले.

'IMA Black day'; 650 doctors in the city of Akola remained closed | ‘आयएमए’ने पाळला काळा दिवस; अकोला शहरातील ६५० डॉक्टरांचे दवाखाने राहिले बंद

‘आयएमए’ने पाळला काळा दिवस; अकोला शहरातील ६५० डॉक्टरांचे दवाखाने राहिले बंद

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील ६५० पेक्षाही अधिक डॉक्टरांचे दवाखाने सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात आले. अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास यामधून वगळण्यात आले. रुग्णालयांमध्ये शुकशुकाट, बाहेरगावाहून शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना याचा फटका बसला.

अकोला: सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकिय आयोग (एनएमसी)विधेयकाविरुध्द इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) झेंड्याखाली देशभरातील डॉक्टरांनी मंगळवार, २ जानेवारी रोजी ‘काळा दिवस’ पाळत काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात अकोला आयएमएनेही सहभाग घेतला असून, शहरातील ६५० पेक्षाही अधिक डॉक्टरांचे दवाखाने सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात आले. अत्यावश्यक सेवा व आंतररुग्ण विभागास यामधून वगळण्यात आले.
आधुनिक वैद्यकशास्त्राचे प्रतिनिधीत्व करणाºया आयएमएने या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविला आहे. खासगी वैद्यकिय महाविद्यालये सुरू करण्यासाठी असलेल्या सर्व अटी या विधेयक मंजूरीत रद्द होणार आहे. महाविद्यालयांचा मनमानी कारभार वाढून बोगस पदवीप्रदान डॉक्टरांची संख्या वाढणार, नियम भंग करणाºया डॉक्टरांना ५ कोटी ते १०० कोटी दंडाची तरतुद असल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळेल, वैद्यकिय शिक्षण महागडे होऊन त्यावर धनदांडग्यांची मक्तेदारी होईल. केवळ पाच राज्ये प्रतिनिधीत्व असतील उर्वरित सर्व २९ राज्ये विन प्रतिनिधीत्व चालतील. सध्याची राज्य वैद्यकिय परिषदांची स्वायत्तता संपुष्टात येईल, विद्यापीठे नावापुरती उरतील. हे विधेयक खासगी व्यवस्थापनाच्या सोईचे आहे. यामुळे आयएमए या विधेयकाला विरोध दर्शवित असल्याचे आयएमए ने स्पष्ट केले आहे. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांना निवेदन देण्यात आले.
एकूणच आयएमएचे सर्व सभासद असलेल्या डॉक्टरांनी एकूण बारा तासांचा लाक्षणिक संप करत ‘काळा दिवस’ पाळला आहे. संध्याकाळी सहा वाजेपासून पुढे सर्व डॉक्टरांकडून नियमितपणे बाह्यरुग्ण तपासणीला सुरूवात होणार असल्याची माहिती आयएमए सचिव डॉ. रणजीत देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

रुग्णालयांमध्ये शुकशुकाट
सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत डॉक्टरांनी संप पुकारल्याने बाह्यरुग्ण तपासणी (ओपीडी) बंद आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी बंद ठेवली आहे. यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. बाहेरगावाहून शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना याचा फटका बसला.


आयएमए सभासदांची बैठक
स्थानिक आयएमए हॉलमध्ये दुपारी आयएमए सभासदांची बैठक घेण्यात आली. आयएमए अकोलाचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयएमएच्या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. यावेळी एनएमसी विधेयकाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला सचिव डॉ. रणजीत देशमुख, डॉ. जुगल चिराणीया, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. शैलेश देशमुख यांच्यासह आयएमएचे सभासद उपस्थित होते.

Web Title: 'IMA Black day'; 650 doctors in the city of Akola remained closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.