मूर्तिजापुरात पर्यावरणपूरक घरगुती बाप्पांचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:21 AM2021-09-21T04:21:21+5:302021-09-21T04:21:21+5:30

गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने नगरपालिकेने तयारी केली होती. गत सात वर्षांपासून संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान प्रमुख सतीश अग्रवाल ...

Immersion of environmentally friendly domestic Bappas in Murtijapur | मूर्तिजापुरात पर्यावरणपूरक घरगुती बाप्पांचे विसर्जन

मूर्तिजापुरात पर्यावरणपूरक घरगुती बाप्पांचे विसर्जन

Next

गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने नगरपालिकेने तयारी केली होती. गत सात वर्षांपासून संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान प्रमुख सतीश अग्रवाल यांनी पर्यावरणपूरक घरगुती गणेश विसर्जनासाठी व्यवस्था केली होती. याठिकाणी येऊन अनेकांनी पर्यावरणपूरक विसर्जन करीत बाप्पाला निरोप दिला. जलप्रदूषण टाळण्यासाठी दरवर्षी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कुंडाचे आयोजन केले जाते. यावेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे, ठाणेदार सचिन यादव, पोलीस निरीक्षक पंढरी कांदे, नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे, माजी उपाध्यक्ष अनिल कुमार जेठवानी, नगसेवक भारत जेठवानी, उपमुख्य अधिकारी अमोल बेलोटे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार अनवर खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप देशमुख, प्रा. अविनाश बेलाडकर, प्रा. दीपक जोशी, समाधान इंगळे, बबलू यादव, मोहम्मद रिजवान सिद्दीकी, सुमित सोनवणे, अंकित अग्रवाल, श्याम कुराडे, दिगंबर भुगूल, राम जोशी, चंदन अग्रवाल, राजेंद्र भटकर, संजय दाबाडे, संतोष ठाकरे, रवी खांडेकर, गजू तायडे, ज्ञानेश टाले, कुणाल मोरे, दीपक रामटेके, वंदे मातरम आपत्कालीन पथक तथा महाकाल सेनेने परिश्रम घेतले.

Web Title: Immersion of environmentally friendly domestic Bappas in Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.