परतीच्या पावसाचा तडाखा; वीज पडून सहा जखमी, पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 06:56 PM2020-10-11T18:56:43+5:302020-10-11T19:01:21+5:30
Akola, Rain, Crop loss शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, जिल्ह्यात वीज पडून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील खांदला येथील दोन जण भाजल्या गेले, तर बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद शिवारात शेळ्या-मेंढ्या चारणाऱ्या गुराख्याच्या झोपडीवर वीज पडून चौघे जखमी झाले आहेत.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले. रविवारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील खांदला येथील विजय दशरथ पिंपळे (४७) व सुनील आधार मोहिते (२५) हे दोघे शेतात गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास तालुक्यात पावसाने अचानक विजेच्या गडगडाटासह जोरदार हजेरी लावली. या दोघांच्या अंगावर वीज पडून ते भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खु. नजीक शेतात शेळ््या-मेंढ्या चारणाºया गुराख्यांनी ठिय्या दिला आहे. गुराख्यांच्या ठिय्यावर वीज पडल्याने आईसह तीन मुले गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी अचानक पाऊस सुरू झाल्याने आई संध्या सदाशिव दडस (४५), मुलगी सीमा सदाशिव तडस (१८), मुलगी सपना सदाशिव तडस (१९) व मुलगा प्रवीण सदाशिव तडस (२१) हे गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पिकांचे नुकसान!
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सध्या शेतात सोयाबीन, ज्वारी पिकाची कापणी करून ठेवली असताना येणाºया परतीच्या पावसाने शेतकºयांची चिंता वाढवली आहे. परतीचा पाऊस सर्वदूर झाला असून, पिकांची नासाडी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकºयांना बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली होती.
गत दोन-तीन दिवसांपासून परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या सोयाबीन, ज्वारी पिकांची सोंगणीची लगबग सुरू असून, शेतकरी कामात व्यस्त आहे. हातातोंडाशी आलेला घास निघून जाऊ नये, म्हणून शेतकरी धावपळ करीत आहे; मात्र जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे सोंगणी केलेले सोयाबीन पीक भिजले. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे शेतात गेलेल्या शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली होती.