विदर्भात हळद लागवडीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:19 PM2018-11-30T17:19:26+5:302018-11-30T17:19:34+5:30
अकोला : विदर्भातील वायगाव हळदीने जागतिक बाजारपेठेत मजल मारली आहे. या हळदीला मोठी मागणी आहे, भौगालिक नामांकन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीवर भर दिला आहे.
अकोला : विदर्भातील वायगाव हळदीने जागतिक बाजारपेठेत मजल मारली आहे. या हळदीला मोठी मागणी आहे, भौगालिक नामांकन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीवर भर दिला असून, शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही लागवड व काढणीसाठी विविध यंत्राची निर्मिती केली आहे.
वर्धा जिल्ह्यातील वायगाव या नावाने संपूर्ण विदर्भात हळदीची ही जात प्रसिद्ध आहे. सेलम, राजापुरी, कृष्णा, फुले स्वरू पा इत्यादी हळदीच्या जाती प्रचलित आहे. तथापि वायगावची हळद ही अत्यंत कमी म्हणजे सात महिन्यात येणारी असून, या हळदीमध्ये कुरकमीन पिवळेपणा ६ ते ७ टक्के आहे. विशेष म्हणजे ही जात अत्यंत सुवासिक आहे. म्हणूनच आंतरराष्टÑीय बाजारपेठेत या हळदीची मागणी आहे. भौगालिक नांमाकंन मिळाल्यानंतर विदर्भात हळदीचे क्षेत्र जवळपास १५ हजार हेक्टरच्यावर पोहोचले आहे. या सर्व पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वायगाव हळदीवर संशोधन सुरू केले असून, शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध यंत्राचा विकास केला आहे.
मसाले पदार्थात हळदीचे प्रमाण २१.६ टक्के आहे. त्यामुळे हळद लागवडीचे प्रमाण वाढतच आहे. तसेच हळदीच्या तेलालाही मागणी आहे़ कृषी विद्यापीठाने तर उत्तम गुणधर्म असलेल्या हळदीच्या पानापासून तेल काढले आहे. या तेलाला सर्वाधिक मागणी राहील, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.
औषधी गुणधर्म
औषधी गुणधर्म असलेले हे तेल हृदयातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी उपयोगी आहे. रक्तशुद्धीकरण करते, रक्तातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त आहे. कफ कमी करते, रोगप्रतिकारकशक्ती वाढविते, सुजीवर प्रभावी आहे, खोकला सर्दीवर जालीम उपाय करणारे आहे. जखम दुरुस्त करता येते. शरीरातील अंतर्गत जखमा द्रुतगतीने भरून निघतात़ परफ्यूममध्ये वापर करता येतो.
वायगाव हळदीला भौगोलिक नामाकंन मिळाल्यानंतर लागवड वाढली असून, शेतकºयांना यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
डॉ. देवानंद पंचभाई,
अधिष्ठाता उद्यान विद्याशास्त्र,
डॉ.पंदेकृवि,अकोला.