श्रमयोगी मानधन, निवृत्ती योजनेसाठी जनजागृती अभियान राबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:34 AM2021-02-18T04:34:08+5:302021-02-18T04:34:08+5:30

अकोला: असंघटीत कामगारांकरीता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्यांकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजना शासनाने लागू केल्या आहेत. त्याअनुषंगाने ...

Implement public awareness campaign for labor honorarium, retirement scheme! | श्रमयोगी मानधन, निवृत्ती योजनेसाठी जनजागृती अभियान राबवा!

श्रमयोगी मानधन, निवृत्ती योजनेसाठी जनजागृती अभियान राबवा!

Next

अकोला: असंघटीत कामगारांकरीता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्यांकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजना शासनाने लागू केल्या आहेत. त्याअनुषंगाने बुधवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत योजनांच्या जिल्हयातील अंमलबजावणी कामाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला. या योजनांचा जिल्ह्यातील लघु व्यापारी व असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करीत, योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांन दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, शासकीय कामगार अधिकारी गौरव नालिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी आर.एस. वसतकार, महिला व बाल विकास विभागाचे परिविक्षा अधिकारी ए.बी. वेरुळकर आदी उपस्थित होते.

यावेळी असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारे ऑटो चालक, विटभट्टीवर काम करणारे, विविध व्यवसायात, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना योजनेची माहिती द्यावी व योजनेचा लाभ घेण्याकरीता त्यांना आवाहन करावे. तसेच विटभट्टी, हॉटेल, बांधकाम अशा ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांवर बाल मजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई. करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.

Web Title: Implement public awareness campaign for labor honorarium, retirement scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.