कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे गरजेचे - डॉ. फारुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 06:15 PM2020-01-21T18:15:38+5:302020-01-21T18:15:48+5:30
कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून, कुटुंब नियोजनाच्या आधुनिक साधनांचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरोग्य उपसंचालक डॉ. रियाझ फारुकी यांनी मंगळवारी येथे केले.
अकोला: शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊन शिक्षणाचे प्रमाण वाढले असले, तरी कुटुंब नियोजनाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. लोकसंख्या नियंत्रण ही बाब देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण असल्याने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून, कुटुंब नियोजनाच्या आधुनिक साधनांचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरोग्य उपसंचालक डॉ. रियाझ फारुकी यांनी मंगळवारी येथे केले. एनजेन्डर हेल्थ आणि सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कुटुंब नियोजन कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोनटक्के, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांची उपस्थिती होती. यावेळी अकोला आणि वाशिम जिल्हयात कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाºया अधिकारी व कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, की स्वयंस्फूतीर्ने काम करुन संवाद साधत तसेच प्रसारमाध्यमांचा वापर करुन जनजागृती केल्यास कुटुंब नियोजनाचे उदिदष्ट सफल होण्यास वेळ लागणार नाही. डॉ.आरती कुलवाल यांनी यावेळी बोलताना आययुसीडी या नवीन तंत्रज्ञानाबददल माहिती दिली. यावेळी डॉ.सोनटक्के, डॉ.पवनीकर, बेंद्रे यांनी आधुनिक साधनांचा वापर करुन कुटुंब नियोजन कार्यक्रमाबाबत जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘अंतरा’ व आययुसीडी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कायार्साठी जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला आणि वाशिम जिल्हा रुग्णालय यांना पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अनिता पजई यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मृती कान्हाकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. पवनीकर, डॉ.सचिन गाडेकर, डॉ. नेमाडे, डॉ.शेख हुसेन, किरण कुलकर्णी, तुषार चिने, डॉ. ललित सरोदे व जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी आदीनी परिश्रम घेतले.