खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:45 PM2019-11-01T12:45:34+5:302019-11-01T12:45:57+5:30

जिल्ह्यातील एकाही गावातील खरीप पिकांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त नाही.

Improved payment of kharif crops is less than 50 paise! | खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी!

खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी!

Next

अकोला : जिल्ह्यातील २०१९-२० यावर्षीच्या खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवार, ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यातील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ४८ पैसे म्हणजेच ५० पैशापेक्षा कमी आहे.
जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी या सातही तालुक्यांतील एकूण १ हजार १२ महसुली गावांपैकी लागवडीयोग्य ९९० गावांची २०१९ -२० या वर्षातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील सर्व लागवडीयोग्य गावांमधील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ४८ पैसे आहे. त्यानुसार जिल्ह्यातील लागवडीयोग्य गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असून, जिल्ह्यातील एकाही गावातील खरीप पिकांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त नाही.

तालुकानिहाय लागवडीयोग्य गावांची अशी आहे पैसेवारी!
तालुका गावे पैसेवारी
अकोला १८१ ४८
अकोट १८५ ४९
तेल्हारा १०६ ४९
बाळापूर १०३ ४७
पातूर ९४ ४८
मूर्तिजापूर १६४ ४७
बार्शीटाकळी १५७ ४७
..........................................................
एकूण ९९० ४८

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान; पैसेवारीही कमी!
जिल्ह्यातील सातही तहसीलदारांमार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आली. त्यानुसार सातही तालुक्यांतील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सोयाबीन, ज्वारी व कपाशी इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरीप पिकांची सद्यस्थितीचा विचार करून जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची सुधारित पैसेवारीही ५० पैशापेक्षा कमी आहे.

 

Web Title: Improved payment of kharif crops is less than 50 paise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.