सुधारीत - जिल्ह्यातील १०३ केंद्रावरील लसीकरण खंडित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:32+5:302021-04-10T04:18:32+5:30
९ दिवसांपूर्वीच वाढविले होते ६७ केंद्र जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यास सुरुवात झाल्याने ६७ कोविड लसीकरण ...
९ दिवसांपूर्वीच वाढविले होते ६७ केंद्र
जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यास सुरुवात झाल्याने ६७ कोविड लसीकरण केंद्र वाढविण्यात आले होते. यापूर्वी जिल्ह्यात ८६ केंद्रावर कोविड लसीकरण केंद्र होते. त्यामुळे जिल्ह्यात १५३ केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली, मात्र आठ दिवसांतच लसीचा तुटवडा भासल्याने शुक्रवारी १०३ लसीकरण केंद्र बंद पडली.
सद्यस्थितीत उपलब्ध डोस
ग्रामीण भाग - ५००
शहरी भाग - २०००
जीएमसीत केवळ दुसरा डोस
गुरुवारी प्राप्त कोव्हॅक्सिन लस ही केवळ दुसऱ्या डोसच्या लाभार्थींना दिला जात असल्याची माहिती आहे. अशा लाभार्थींसाठी सर्वोपचार रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर दुसरा डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
आज बहुतांश केंद्र पडणार बंद
जिल्ह्यात सद्यस्थितीत उपलब्ध साठा एक दिवस पुरेल येवढाही शिल्लक नाही. त्यामुळे शनिवारी काही केंद्र वगळता जिल्ह्यातील उर्वरीत सर्वच केंद्र बंद हाण्याची शक्यता आहे.